Monday, 27 October 2025

कधीच खराब होणार नाही लिव्हर! आहारात करा ‘या’ एका फळाचा समावेश; लिव्हरमध्ये चिकटून राहिलेली घाण होईल स्वच्छ

कधीच खराब होणार नाही लिव्हर! आहारात करा ‘या’ एका फळाचा समावेश; लिव्हरमध्ये चिकटून राहिलेली घाण होईल स्वच्छ
: आपल्या शरीरातील लिव्हर योग्य प्रकारे कार्य करत राहण्यासाठी योग्य आहार महत्त्वाचा आहे. दररोज आहारात ‘हे’ फळ समाविष्ट केल्यास लिव्हरमधील चिकटलेली घाण साफ होऊन ते निरोगी राहते.

 
लिव्हरला चिकटलेली घाण स्वच्छ करते ‘हे‘ एक फळ 

 आपल्या शरीरात यकृत (लिव्हर) हा असा एक अवयव आहे, जो शांतपणे आपलं काम करीत राहतो. पण तोच जर आजारी पडला, तर सगळं शरीर कोलमडून जातं. रक्त शुद्ध करणं, शरीरातील विषारी घटक बाहेर टाकणं आणि अन्नाचं ऊर्जेत रूपांतर करणं ही सर्व कामं हा अवयव एकट्यानंच करतो. पण, आजच्या धावपळीच्या आणि असंतुलित जीवनशैलीमुळे या यकृताच्या कार्याचं ओझं प्रचंड वाढलं आहे.


तळलेले पदार्थ, फास्ट फूड, जंक फूड, थंड पेय व मद्यपान या सगळ्यांचा विपरीत परिणाम थेट यकृतावर होत असतो. त्यामुळे यकृतात अनारोग्यकारी चरबी (फॅट) साचू लागते आणि त्याचं कामकाज बिघडतं. परिणामस्वरूप होणारा ‘फॅटी लिव्हर’चा नवा आजार आज जवळजवळ प्रत्येक घरात आपलं डोकं वर काढू लागला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, दरवर्षी देशभरात लाखो लोक यकृताशी संबंधित आजारांनी त्रस्त आहेत.


सुरुवातीला थकवा, पोट फुगल्यासारखं वाटणं, अन्न न पचणं व डोळ्यांभोवती काळी वर्तुळं ही काही लक्षणं दुर्लक्षित केली जातात; पण हीच यकृताच्या बिघाडाची पहिली घंटा असते. शरीरातील घाण, टॉक्सिन्स आणि अति तेलकट पदार्थांमुळे यकृताला सूज येते आणि त्याची कार्यक्षमता कमी होते. डॉक्टरांच्या मते, जर वेळीच योग्य ती काळजी घेतली नाही, तर ही सूज पुढे यकृत निकामी होण्याचं कारण ठरते.


पण, दिलासा देणारी बाब म्हणजे यावर उपाय आहे आणि तोही तुम्हाला सहजपणे उपलब्ध होणारे एक भारतीय फळ. आयुर्वेदात त्या फळाला यकृताचा ‘सर्वोत्तम रक्षक’, असं म्हटलं गेलं आहे. या फळात इतकी ताकद आहे की, ते यकृतातील चरबी ‘कापून’ टाकतं, सूज कमी करतं आणि शरीरातील विषारी घटक बाहेर काढतं.


आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. सुभाष गोयल यांच्या मते, आज जवळपास ९० टक्के लोकांमध्ये फॅटी लिव्हरची लक्षणं आढळतात. अशा स्थितीत हे फळ म्हणजे देवदत्त उपायच आहे. त्यात विटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स व पॉलीफेनॉल्स मुबलक प्रमाणात असतात, जे यकृताच्या पेशींना पुन्हा सक्रिय करतात आणि त्याचं नुकसान टाळतात.

याच फळाच्या नियमित सेवनामुळे केवळ यकृताचं आरोग्य सुधारत नाही, तर शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते, सूज कमी होते आणि त्वचा तजेलदार राहते. आपल्या आरोग्याला संजीवनी देणारे हे जादुई फळ कोणते असेल, तर त्याचे नाव आवळा असे आहे.

आवळा : यकृताचा खरा मित्र
आवळा हा यकृताचा खरा मित्र मानला जातो. त्यात असलेलं व्हिटॅमिन सी व अँटिऑक्सिडंट्स यकृतातील चरबी विरघळवतात आणि त्याला पुन्हा ताजेतवाने करतात. रोज एक आवळा खाल्ल्यानं यकृताची कार्यक्षमता वाढते, अनारोग्यकारक चरबी जमा होत नाही आणि शरीरातली घाण स्वच्छ होते.

तज्ज्ञ सांगतात, की आवळा खाल्ल्यानं केवळ यकृतच नाही, तर संपूर्ण शरीर तरुण, तंदुरुस्त व ऊर्जावान राहतं. मग फॅटी लिव्हरचा धोका टाळण्यासाठी तुमच्या आहारात आजपासूनच आवळा जरूर समाविष्ट करा. कारण- तुमच्या यकृताचा खराखुरा ‘संरक्षक’ तोच आहे.
माहितीस्तव शेअर... रवि जवंजाळ...

तुळशीला कोणी दिला होता श्राप? म्हणूनच गणपतीच्या पूजेत तुळशीचा वापर केला जात नाही का?

तुळशीला कोणी दिला होता श्राप? म्हणूनच गणपतीच्या पूजेत तुळशीचा वापर केला जात नाही का?


     हिंदू धर्मात तुळशीला पवित्र आणि दिव्य मानले जाते. यासंदर्भात एक विशेष गोष्ट अशी आहे की, गणपतीच्या पूजेदरम्यान तुळशीचा वापर कधीही केला जात नाही.

तुळशीला कोणी दिला होता श्राप?

    २ नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह साजरा केला जाईल. धार्मिक श्रद्धेनुसार, या दिवशी भगवान विष्णू त्यांच्या चार महिन्यांच्या योगिक निद्रेमधून जागे होतात. या चार महिन्यांना चातुर्मास असे म्हणतात. हिंदू धर्मात शुभ कार्य भगवान विष्णू जागे झाल्यानंतरच सुरू करतात असे मानले जाते. या दिवशी तुळशी विवाह साजरा केला जातो. हिंदू धर्मात तुळशीला पवित्र आणि दिव्य मानले जाते. असं असताना यासंदर्भात एक मनोरंजक आणि विशेष गोष्ट अशी आहे की, गणपतीच्या पूजेदरम्यान तुळशीचा वापर कधीही केला जात नाही. यामागे एक पौराणिक कथा आहे ती जाणून घेऊ…

तुळशीने आणि गणपतीने का दिले एकमेकांना श्राप?

तुळशी माता यांचं गणेशावर प्रेम होतं आणि त्यांच्याशी त्या विवाह करू इच्छित होत्या. कथेनुसार, एक दिवशी तुळस आपल्या मनातील इच्छा व्यक्त करण्यासाठी थेट गणेशाकडे गेली. तिने नम्रपणे गणेशाला आपल्या भावना व्यक्त केल्या आणि लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. असं असताना गणेशाने तिचा विवाह प्रस्ताव नाकारला. हा नकार तुळशीसाठी खूप दु:खद आणि अमपानकारक होता. तिची भक्ती आणि प्रेम असूनही गणेशाने ते शक्य मानले नाही. परिणामी तुळस संतापली आणि तिने गणेशाला श्राप दिला की त्यांची दोन लग्न होतील.

या शापामुळेच गणेशाने रिद्धी आणि सिद्धी या दोन दिव्य बहि‍णींशी लग्न केले. तुळशीच्या शापामुळे गणेश संतप्त झाले आणि त्यांनी तुळशीलाही श्राप दिला. गणेशाने तुळस एका राक्षसाशी लग्न करेल असा श्राप दिला. या श्रापामुळे तुळशीने राक्षस कुळातील राजा जालंधरशी विवाह केला.

पौराणिक कथेनुसार, तुळशी मातेला तिची चूक कळताच तिने गणेशाची माफी मागितली. गणेशाने तिची प्रार्थना ऐकली आणि वचन दिले की कालांतराने तुळशीमाता एक वनस्पतीचे रूप धारण करेल. तिची पूजा आणि आदर केला जाईल. या वनस्पतीला तुळशी असे नाव देण्यात आले आणि ती धार्मिक विधी आणि आध्यात्मिक शुद्धीकरणासाठी प्रतीक मानली जाऊ लागली. त्यावेळी गणेशाने हेही स्पष्ट केले की, त्याच्या पूजेत मात्र तुळशीचा वापर केला जाणार नाही. म्हणूनच आजही गणपतीच्या पूजेत तुळशी अर्पण करण्याची पद्धत नाही.

कोंडा दूर करण्यासाठी, नैसर्गिकरित्या केस गळणे थांबवण्यासाठी तेलात ‘या’ गोष्टी करा मिक्स

कोंडा दूर करण्यासाठी, नैसर्गिकरित्या केस गळणे थांबवण्यासाठी तेलात ‘या’ गोष्टी करा मिक्स
केस गळण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे कोंडा. अनेक शँम्पू आणि अन्य गोष्टींचा वापर करूनही कोंडयाची समस्या जात नाही. तर तेलात या गोष्टी मिक्स करून लावल्याने कोंडा दूर होईल आणि केस गळणे कमी होईल.

मुले असोत किंवा मुली आजकाल प्रत्येकाला केस गळण्याच्या व केसांमध्ये कोंडा होण्याच्या समस्या सतावत असते. अशातच हिवाळा सुरू होताच, कोंड्याची समस्या अधिकच वाढते, ज्यामुळे केस जास्त प्रमाणात गळू लागतात. तसेच कोंडा झाल्याने स्कॅल्पमध्ये खाज सुटते. अशातच अनेकजण यापासून सुटका मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय करत असतात. कोणत्याही शँम्पू आणि अन्य गोष्टींचा वापर करूनही कोंडा काही कमी होत नाही. अशावेळेस काही नैसर्गिक गोष्टी केसांना लावल्याने केवळ कोंडा दूर करू शकत नाहीत तर केस गळणे कमी करण्यास देखील मदत करू शकतात. या लेखात, आपण अशा पाच घटकांबद्दल जाणून घेऊ जे तुम्ही तेलात मिक्स करून लावू शकता. यामुळे तुम्हाला जास्त त्रास होणार नाही, तुमचे केस जाड आणि मजबूत होतील आणि कोंड्याच्या समस्येपासूनही आराम मिळेल.


जास्त कोंडा तुमचे केस कमकुवत करतात ज्यामुळे केस तुटू शकतात. तुमचा दैनंदिन आहार सुधारण्यासोबतच, केसांची योग्य काळजी घेतल्याने तुम्हाला केसांच्या समस्यांवर मात करण्यास मदत होऊ शकते.


लिंबाचा रस
लिंबाचा रस तेलात मिक्स करून स्कॅल्पला लावल्याने कोंडा दूर होतो आणि खाज सुटत नाही. यामुळे केस चमकदार होतात, परंतु जास्त लिंबाचा रस मिक्स करू नका आणि जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर हा उपाय करने टाळा.

जटामांसी (स्पाइकनार्ड) रस
स्पाइकनार्ड म्हणजेच जटामांसी आयुर्वेदिक वनस्पती आहे जी केसांसाठी एक उत्तम औषध आहे. तर ही वनस्पती हिमालयात अधिक आढळून येते आणि ही एक सुंगधीत औषध वनस्पती आहे. तुम्ही स्पाइकनार्ड नारळाच्या तेलात भिजवू शकता आणि हे तेल तुमच्या स्कॅल्पपासून केसांच्या टोकापर्यंत लावू शकता. यामुळे केस मजबूत होतात आणि केस गळणे कमी होते.

आवळा पावडर
तुम्ही जेव्हा केसांना तेल लावता तेव्हा तेलात आवळा पावडर मिक्स करून लावू शकता. यामुळे केस काळे आणि जाड होण्यास मदत होते, कोंडा कमी होतो आणि केसांची वाढ वाढते.

कढीपत्ता
हेअर ऑईलमध्ये कढीपत्त्याची पाने मिक्स करून लावल्याने कोंडा कमी होतो आणि केस गळणे आणि स्कॅल्पची जळजळ थांबण्यास मदत होते. यासाठी गॅसवर एका भाड्यात पाणी टाका आणि त्यावर आणखीन एक भांड ठेवा त्यात केसांना लावायचे तेल आणि या तेलात कढीपत्त्याची पाने टाकून उकळवा. आता हे तेल कोमट झाल्यावर केसांना लावून ठेवा व थोड्यावेळात शॅम्पू करा.

कोरफड जेल
कोरफड जेल कोरडा कोंडा कमी करण्यापासून ते केसांना मऊ आणि चमकदार बनवण्यापर्यंत आश्चर्यकारकपणे काम करते. तुम्ही कोरफड जेल नारळाच्या तेलात मिक्स करून लावू शकता. प्रत्येक शॅम्पू करण्यापूर्वी किमान एक तास आधी कोरफड आणि नारळाच्या तेलाचे मिश्रण लावा. तुम्हाला पहिल्यांदाच उत्कृष्ट परिणाम दिसतील.
माहितीस्तव शेअर... रवि जवंजाळ.. सांगोला.

Sunday, 26 October 2025

गव्हाची चपाती खाण्याऐवजी एक महिना या पिठाची भाकरी खा, झटपट वजन कमी करा

गव्हाची चपाती खाण्याऐवजी एक महिना या पिठाची भाकरी खा, झटपट वजन कमी करा


बैठी जीवनशैली आणि हालचाल कमी झाल्याने अनेकांना कमी वयातच अनेक आजार होत आहेत. जर तुम्हाला हाडे आणि मसल्स कायम ठेवत वजन कमी करायचे असेल तर गव्हाची चपाती बंद करुन या पिठाच्या भाकरी खाव्यात...

आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्यासाठी लोकांना वेळ काढता येत नाहीए. त्यामुळे सकाळी नाश्त्याला फाटा मिळत आहे. तसेच दुपारी जे मिळेल ते खाल्ले जात आहे. आणि रात्री जड जेवण घतेल्याने पोटात चरबी साठत आहे. त्यामुळे वजन वाढल्याने अनेक आजार होत आहेत. अनेक लोक वजन कमी करण्यासाठी महागड्या जिम जॉईंट करत आहेत. महागड्या डाएट आणि निरनिराळे उपाय करुनही वजन काही केल्या कमी होत नसल्याचे पुढे येत आहे.


परंतू यावरील उपाय तुमच्या किचनमध्ये लपलेले आहे. रोज तुम्ही गव्हाची चपाती खात असाल तर तिला बदला आणि त्याऐवजी ज्वारी किंवा नाचणीची भाकरी खात जा. त्यामुळे कोणताही जास्त व्यायाम न करता तुम्हाला वजन कमी करता येऊ शकते. चला तर पाहूयात वजन कमी करण्यासाठी कोणत्या पीठाची भाकरी खाणे योग्य आहे. वजन कमी करण्यासाठी ज्वारी की नाचणी उपयोगी असते ते पाहूयात…


ज्वारीची भाकरी – फिटनेस आणि एनर्जीचा पॉवर हाऊस म्हणजे ज्वारी आहे. जे लोक जिममध्ये जातात आणि वर्कआऊट करुन मसल्स बनवू इच्छीत आहेत त्यांच्यासाठी ज्वारीची भाकरी वरदान ठरू शकते.


प्रोटीनने भरपूर – ज्वारीत प्रोटीनचे प्रमाण जास्त असते.त्यामुळे स्नायूंना ताकद मिळते आणि स्नायूं कमजोर होण्यापासून वाचतात.

भूकेवर नियंत्रण – ज्वारीत फायबर मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे एक किंवा दोन भाकरी खाल्ल्यानंतर लगेच पोठ भरते. त्यामुळे अनेक तास तुम्हाला भूक लागत नाही.त्यामुळे विनाकारण काहीही खाण्याला लगाम लागतो.

पोटासाठी फायदेशीर – ज्वारी पचनासाठी चांगली असते. पोट फुगणे असा समस्यांपासून आपल्याला वाचवते.

कोणासाठी बेस्ट – जर तुम्हाला वजन कमी करण्या सोबतच शरीराला फिट आणि एनर्जेटिक राखायचे असेल तर ज्वारी तुमच्यासाठी योग्य आहे.

नाचणीची भाकरी – नाचणीची भाकरी खाल्ल्याने तुम्ही बारीक होऊ शकता. आणि हाडे देखील मजबूत होतात. आयुर्वेदात नाचणीला पौष्टीक गुणांचा खजाना म्हटले आहे.ही केवळ वजन कमी करत नाही तर शरीराला आतून देखील मजबूत बनवते.

कॅल्शियमचा राजा: नाचणीत दूधाहून अनेक पटीने कॅल्शियमचे प्रमाण जादा असते.

वजन कमी करण्यात मास्टर – नाचणीत ज्वारीपेक्षा जास्त फायबर असते. नाचणीची भाकरी खाल्ल्याने पोट असे भरते की तुम्हाला बराच काळ आणखी काही खाण्याची इच्छा होत नाही. ज्यामुळे कॅलरीचे इनटेक आपोआप कमी होते. वजन वेगाने कमी होते.

कोणासाठी आहे बेस्ट – तुम्ही जर केवळ बारीक न होता हाडांना देखील मजबूत करु इच्छीत असाल तर नाचणी तुमच्यासाठी महत्वाची आहे.

अखेर कोणत्या पिठाची भाकरी बेस्ट – आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. दीपांकर अत्रे यांच्या मते ज्वारी आणि नाचणी ही दोन्ही धान्ये चांगले पोषक आहेत. परंतू तुमचे लक्ष्य काय आहे ? जर वजन घटवणे आणि मसल्स वाचवणे हे तुमचे लक्ष असेल तर ज्वारीच्या भाकरीची निवड करावी.

जर लक्ष्य वजन घटवणे आणि हाडांना मजबूत करण्याचे असेल तर नाचणीची भाकरी तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे. तर तुम्ही गव्हाच्या चपातीला काही काळ आराम द्यावा आणि हे दोन सुपरफूड भाकऱ्या ट्राय कराव्यात. काही आठवड्यातच तुम्हाला फरक जाणवेल.

Saturday, 25 October 2025

सावधान! मध्यरा‍त्रीपर्यंत झोप येत नाही, दररोज जागरण होतेय? तर हा गंभीर आजार

सावधान! मध्यरा‍त्रीपर्यंत झोप येत नाही, दररोज जागरण होतेय? तर हा गंभीर आजार आहे...मध्यरात्रीनंतर जागरण करणं मेंदूच्या कार्यक्षमतेवर आणि भावनांवर नकारात्मक परिणाम करु शकतं. झोपेचा अभाव ताण, नैराश्य आणि चिडचिड वाढवतो, त्यामुळे झोपेचं आरोग्य जपा.


मध्यरात्रीनंतर जागरण केल्याने मेंदूची कार्यक्षमता आणि भावनिक स्थैर्य कमी होते.

सर्केडियन रिदम बिघडल्याने ताण आणि चिडचिड वाढते.

कमी झोपेमुळे स्मरणशक्ती आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करतो.

नियमित झोपेच्या सवयींनी मेंदू आणि मनाला विश्रांती मिळते.

आजच्या २४ तासांच्या डिजिटल जगात, रात्री उशिरापर्यंत जागरण करणं आता अनेकांसाठी सोपं झालं आहे. ऑफिसचं काम पूर्ण करणं, सोशल मीडियावर स्क्रोल करणं किंवा सिरीज बघण्यात वेळ घालवणं हे सगळं आता नॉर्मल मानलं जातं. मात्र निसर्गाने बनवलेला आपल्या शरीराचा आणि मेंदूचा घड्याळाचा रिदम तसा नाही. वैज्ञानिक संशोधनानुसार, मध्यरात्रीनंतर जागरण करणं आपल्या मेंदूच्या कार्यक्षमतेवर आणि भावनिक स्थैर्यावर गंभीर परिणाम करू शकतं. पुढे जागरणामुळे आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.




Mind After Midnight प्रभाव म्हणजे नेमकं काय?

Frontiers in Network Physiology या वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, मध्यरात्रीनंतर मेंदूची संज्ञानात्मक क्षमता, निर्णय घेण्याची क्षमता आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता कमी होते. या काळात शरीरातील जैविक घड्याळ अर्थात circadian rhythm विस्कळीत होतो. त्यामुळे व्यक्ती जास्त उतावळी, अस्थिर आणि चिडचिडी बनते.


रात्री जागरणाने मेंदूवर काय परिणाम होतो?

रात्री उशिरापर्यंत जागरण केल्याने न्यूरॉन्सची कार्यक्षमता कमी होते आणि सेरोटोनिन व डोपामाइनसारख्या न्यूरोट्रान्समीटरच्या संतुलनात बदल होतो. यामुळे व्यक्तीचा मूड पटकन बदलतो. तसेच लक्ष केंद्रित ठेवणं कठीण जातं आणि निर्णय घेताना चुका होतात. संशोधनात असंही आढळलं आहे की, रात्री उशिरा जागणाऱ्या लोकांमध्ये नकारात्मक भावना आणि ताण अधिक प्रमाणात दिसून येतो.

कमी झोपेमुळे मानसिक आणि भावनिक परिणाम

कमी झोपेमुळे फक्त थकवा नाही तर मानसिक अस्थिरता निर्माण होते. रात्री उशिरा नकारात्मक भावनांचा टप्पा वाढतो. त्यामुळे नैराश्य, चिंता आणि चिडचिड निर्माण होऊ शकते.




जास्त वेळ उशिरापर्यंत जागरणाचे धोके

जास्त वेळ उशिरापर्यंत जागणं आणि झोपेचा विस्कळीत पॅटर्न हे मेंदूच्या वृद्धिंगत प्रक्रियेला गती देतात. अशा लोकांमध्ये cognitive decline (स्मरणशक्ती कमी होणे) आणि dementiaचा धोका वाढतो. मेंदूतील white matter मध्ये बदल होऊन Alzheimer सारख्या आजारांचा धोका वाढतो.
माहितीस्तव शेअर... रवि जवंजाळ.. सांगोला.

नवऱ्यापासून 'या' ४ गोष्टी लपवणं आहे शहाणपणाचं काम; नाहीतर सुखी संसारात येईल दु:ख

तुमच्या पतीसोबत तुम्ही काही गोष्टी शेअर केल्याने तुमचे नाते बिघडू शकते? आचार्य चाणक्य त्यांच्या नीतीमध्ये महिलांना चार गोष्टींपासून सावध करण्यात आले आहे. या चार गोष्टी नवऱ्याला माहिती झाल्या तर आनंदी जीवनात दु:ख येतात.


चाणक्य नीतीमध्ये वैवाहिक नात्यांवरील मार्गदर्शन करण्यात आले आहे.

महिलांनी चार गोष्टी नवऱ्यापासून लपवाव्यात

संयम, शहाणपणा आणि विचारपूर्वक वागणं हे सुखी संसाराचा मंत्र आहे.

आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील एक महान विचारवंत होते. त्यांचे उपदेश आजही जीवनाचे मार्गदर्शन करतात. त्यांच्या ज्ञानाचा वापर करून, त्यांनी जीवनातील तत्वे स्थापित केली. या नीतीनुसार प्रत्येक व्यक्तीला आनंद, यश आणि स्थिरता मिळते. आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या नीतीमध्ये काही गोष्टी आहेत, ज्या प्रत्येक विवाहित महिलेने अवलंब केला पाहिजे.

नाहीतर वैवाहिक जीवनात प्रेम आणि आदर टिकून राहणार नाही. चाणक्य नीतिनुसार जर महिलांनी त्यांच्या पतींसोबत काही गोष्टी शेअर केल्या तर त्यांचे नाते हळूहळू तुटू लागते. चला जाणून घेऊया त्या गोष्टी कोणत्या आहेत.


माहेरकडील चर्चा जास्त करू नका
आचार्य चाणक्य यांच्या मते, पत्नीने तिच्या पालकांच्या घराबद्दलची प्रत्येक गोष्ट तिच्या पतीला सांगू नये. नेहमी माहेरच्या गोष्टी सांगतिल्यानं पत्नी नेहमीच तिच्या पालकांच्या घराची बाजू घेते किंवा तुलना करत असते, असं तिच्या नवऱ्याला वाटू लागते. यामुळे घरातील वातावरण बिघडू शकते आणि अनावश्यक तणाव निर्माण होऊ शकते. संतुलन राखणे, फक्त आवश्यक गोष्टींवर चर्चा करणे शहाणपणाचे आहे.


पैशांची बचत
आचार्य चाणक्य यांच्यानुसार,पत्नीने नेहमी वैयक्तिक बचतीचे चर्चा करू नये. या गोष्टींमुळे कधीकधी गैरसमज निर्माण होऊ शकतात. आर्थिक बाबींमध्ये पारदर्शकता महत्त्वाची आहे, पण वैयक्तिक आर्थिक स्वातंत्र्यही तितकेच महत्त्वाचे आहे. हुशारीने खर्च करणे आणि योग्य हेतूने बचत करणे तुमचे नाते मजबूत करत असते.


मनाला लागणारे शब्द
प्रत्येक नाते परस्पर आदरावर बांधले जात असते. चाणक्य नीती म्हणते की रागाच्या भरात आपण काही बोलून जात असतो. त्यामुळे आपल्या जोडीदाराचे मन दुखवले जाऊ शकते. बोलले शब्द परत घेता येत नाही. कधीकधी, स्त्रिया वादाच्या वेळी किंवा रागाच्या वेळी असे काही बोलतात ज्यामुळे त्यांचे पतीचे दुखावत असते. रागाच्या वेळी गप्प राहणे आणि मन शांत असताना बोलणे चांगले असते. शांतता ही नातेसंबंधांमध्ये सर्वात मोठी ताकद आहे.


खोटेपणा
चाणक्य नीती स्पष्टपणे सांगते की, "खोटेपणा ही नात्यातील सर्वात मोठी कमजोरी आहे." पती-पत्नीमधील नाते विश्वासावर आधारित असते. एकदा का विश्वास तुटला की तो पुन्हा निर्माण करणे अत्यंत कठीण असते. म्हणून, परिस्थिती कितीही कठीण असली तरी कधीही खोटे बोलू नका.

आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या तुळशीचे शरीराला होतात भरमसाट फायदे! घरातील हवा कायमच राहील खेळती

आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या तुळशीचे शरीराला होतात भरमसाट फायदे! घरातील हवा कायमच राहील खेळती
हिंदू धर्मात तुळशीच्या झाडाला विशेष महत्व आहे. तुळशीच्या पानांचा वापर धार्मिक कार्यक्रमांसाठी केला जातो. पूजा किंवा इतर अनेक गोष्टी करताना तुळशीची पाने लागतात. त्यामुळे घराच्या अंगणात तुळशीचे एकतरी रोप लावावे. यामुळे केवळ शारीरिक आरोग्यालाच नाहीतर मानसिक आरोग्याला सुद्धा अनेक फायदे होतात. घरातील हवा कायमच खेळती राहते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला घरात तुळशीचे रोप लावल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. 

आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या तुळशीचे शरीराला होतात भरमसाट फायदे! घरातील हवा कायमच राहील खेळती


1 / 5
तुळशीची पाने नॅचरल एअर प्यूरीफायर म्हणून काम करतात. यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीमायक्रोबियल गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात, ज्यामुळे हवेतील हानिकारक बॅक्टेरिया आणि टॉक्सिन्स बाहेर पडून जातात.

2 / 5
तुळस लावल्यामुळे मानसिक शांतता कायम टिकून राहते. यामध्ये असलेली गुणकारी तत्व शरीरासाठी अतिशय प्रभावी ठरतात. मन शांत राहते, झोपेची गुणवत्ता सुधारते इत्यादी अनेक फायदे होतात.

3 / 5
सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा पिण्याऐवजी तुळशीच्या पानांचा चहा बनवून प्यावा. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती निरोगी राहते आणि आरोग्य सुधारते.

4 / 5
तुळशीमध्ये असलेल्या तत्त्वांमुळे डासांपासून शरीराचा बचाव होतो. त्यामुळे घरात एक तरी तुळशीचे रोप लावावे. यासाठी तुम्ही तुळशीच्या पानांचा वापर करून स्प्रे सुद्धा बनवू शकता.

5 / 5
धार्मिक दृष्ट्या घरात तुळशीचे रोप लावणे अतिशय फायद्याचे मानले जाते. यामुळे वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येत नाही.
माहितीस्तव शेअर... रवि जवंजाळ..सांगोला.

Friday, 24 October 2025

‘हा’ पक्षी वर्षातून फक्त एकदा पितो पाणी, 99 टक्के लोकांना नाव माहिती नाही

‘हा’ पक्षी वर्षातून फक्त एकदा पितो पाणी, 99 टक्के लोकांना नाव माहिती नाही


Unique Bird: आपल्या पृथ्वीवर प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या अनेक प्रजाती आहेत. यात एक असा पक्षी आहे जो वर्षातून फक्त एकदाच पाणी पितो. 99 टक्के लोकांना या पक्ष्याचे नाव माहिती नाही. आज आम्ही तुम्हाला त्याबद्दल माहिती सांगणार आहोत.


1 / 5

वर्षातून एकदा पाणी पिणाऱ्या पक्ष्याचे नाव चातक असे आहे. हा पक्षी फक्त स्वाती नक्षत्राच्या वेळी पाणी पितो. पावसाळ्यात आकाशातून पडणारा पावसाचा पहिला थेंब चातक पक्षी पितो.


2 / 5

आपल्या देशात चातक पक्षी हा आशेचे आणि अपेक्षेचे प्रतीक मानला जातो. हा पक्षी नेहमी आकाशाकडे तोंड करून पावसाची वाट पाहत असतो. हे आशेचे आणि अपेक्षेचे प्रतीक आहे.


3 / 5

चातक हा कोकिळ प्रजातीतील पक्षी आहे. या पक्ष्याचा रंग काळा आणि पांढरा असतो. याच्या डोक्यावर टोकदार शिखर असते. त्यामुळे हा पक्षी खूप सुंदर दिसतो.



4 / 5

भारतात मान्सून कधी दाखल होणार याची सूचना चातक पक्षी देत असतो. हा पक्षी तो पावसाळ्याच्या काही दिवस आधी दिसतो. हा पक्षी कीटक खाऊन आपला उदरनिर्वाह करतो.


5 / 5

चातक हा एक प्रकारचा स्थलांतरित पक्षी आहे. पावसाळ्यात ते आफ्रिकेतून भारतात प्रवास करतो. पावसाळा संपल्यानंतर तो पुन्हा आफ्रिकेला जातो.
माहितीस्तव शेअर... रवि जवंजाळ... सांगोला.

जेवणानंतर फक्त ४ लवंग एका ग्लास पाण्यात टाकून प्या? काय कमाल होईल पाहा


संशोधनानुसार, लवंगातील सक्रिय यौगिक यकृताच्या आरोग्यास मदत करतात आणि ब्लड शुगर नियंत्रित ठेवतात. आरोग्यासाठी चार लवंग एका ग्लास पाण्यात मिसळून सेवन करणे फायदेशीर ठरते.

जेवणानंतर फक्त ४ लवंग एका ग्लास पाण्यात टाकून प्या (फोटो सौजन्य - लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
लवंग हा एक अत्यंत उपयोगी मसाला आहे, जो अन्नाची चव वाढवतो आणि अनेक आरोग्य फायदे देखील देतो. लवंगामध्ये एंटीऑक्सिडंट गुण भरपूर असतात, जे ब्लड शुगर नियंत्रित करण्यात मदत करतात आणि शरीरातील हानिकारक बॅक्टेरियाचा नाश करतात. लवंग, ज्याला सिझीजियम अरोमॅटिकम म्हणतात, ती संपूर्ण मसाल्याच्या स्वरूपात किंवा बारीक पावडर म्हणून वापरली जाते. मांसाहारी पदार्थांची चव वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो.

पारंपरिक औषधांमध्येही लवंगचा वापर दीर्घकाळापासून होत आहे. संशोधनानुसार, लवंगातील सक्रिय रासायनिक घटक यकृताच्या आरोग्यास मदत करतात आणि ब्लड शुगर नियंत्रित ठेवतात. आरोग्यासाठी चार लवंग एका ग्लास पाण्यात मिसळून सेवन करणे फायदेशीर ठरते.

१. पचन सुधारते
लवंगामध्ये असलेले जैविकदृष्ट्या सक्रिय संयुगे शरीराच्या अनेक कार्यांमध्ये उपयुक्त असतात. हे पाणी प्यायल्याने पाचक एंजाइमचे उत्पादन वाढते, ज्यामुळे अन्न लवकर आणि योग्यरित्या पचते. जेवणानंतर हे पाणी प्यायल्याने गॅस, अपचन, पोट फुगणे आणि आम्लता यासारख्या पोटाच्या समस्या कमी होतात. पोट शांत करून आणि पचनसंस्थेला आराम देऊन, शरीर पोषक तत्वे चांगल्या प्रकारे शोषण्यास सक्षम होते आणि उर्जेचा योग्य वापर होतो.

२. रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते
लवंगामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट विशेषतः युजेनॉल आहे जे शरीरातील हानिकारक मुक्त रॅडिकल्सना निष्क्रिय करून ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि संसर्गाशी लढण्याची क्षमता वाढते. नियमित सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि आजारपणात आरोग्याची प्रक्रिया तीव्र होते.

३. चयापचयात सुधारणा
जेवणानंतर लवंगाचे पाणी प्यायल्याने चयापचय सुधारते, ज्यामुळे शरीरातील कॅलरीज बर्न करण्याची प्रक्रिया वेगवान होते. लवंगामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि सक्रिय संयुगे चरबीचे चयापचय वाढवतात, भूक नियंत्रित करतात आणि अन्नातील पोषक तत्वांचे शोषण सुधारतात. नियमित सेवनाने वजन कमी होण्यास मदत होते, पोटाची चरबी कमी होते आणि उर्जेची पातळी वाढते, ज्यामुळे शरीर अधिक सक्रिय आणि निरोगी होते.

४. मधुमेह नियंत्रित करते
लवंगाचे पाणी इन्सुलिन संवेदनशीलता सुधारून आणि स्टार्चचे ग्लुकोजमध्ये रूपांतर कमी करून रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करू शकते. हे विशेषतः प्री-डायबिटीज किंवा टाइप २ मधुमेह असलेल्या लोकांसाठी फायदेशीर आहे. याव्यतिरिक्त, लवंगाचे दाहक-विरोधी गुणधर्म ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात आणि इन्सुलिन कार्यक्षमता वाढवतात.

५. मौखिक आरोग्य सुधारते
लवंगमध्ये अँटीमायक्रोबियल आणि वेदना कमी करणारे गुणधर्म असतात. जेवणानंतर लवंगाचे पाणी प्यायल्याने तोंडाची दुर्गंधी कमी होते आणि तोंडातील बॅक्टेरियाची वाढ नियंत्रित होते. ते नैसर्गिक कफनाशक म्हणून काम करते, श्लेष्मा साफ करते, खोकला कमी करते आणि थंड हवामानात श्वसन आरोग्य सुधारते.

६ दाहकता नियंत्रित करते
नियमितपणे लवंगाचे पाणी प्यायल्याने शरीरात दाहक-विरोधी संयुगे बाहेर पडतात, जे सांधे आणि स्नायूंची सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करतात. त्यातील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील हानिकारक मुक्त रॅडिकल्स काढून टाकतात आणि डिटॉक्सिफिकेशनला प्रोत्साहन देतात. सफरचंदांचे नियमित सेवन ऊर्जा वाढवते आणि गंभीर आजारांचा धोका कमी करते.
... रवि जवंजाळ.. सांगोला.


रोजञ केवळ २-३ तासच झोपता का? तेव्हा मेंदू आणि शरीराचे काय होते माहीत आहे का?


 २०२५च्या झोपेच्या आकडेवारीच्या आहवालानुसार, जगभरातील सुमारे एक तृतीयांश प्रौढांना दिलेल्या सल्ल्याच्या सात तासांपेक्षा कमी झोप मिळते.
दीर्घकाळ झोपेच्या अभावामुळे उच्च रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, नैराश्य आणि स्मरणशक्ती कमी होण्याचा धोका
दीर्घकाळ झोपेच्या अभावामुळे उच्च रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, नैराश्य आणि स्मरणशक्ती कमी होण्याचा धोका

Long-term sleep deprivation risks: आजच्या धावपळीच्या जगात झोपेची कमतरता ही एक सामान्य समस्या बनली आहे. सतत स्क्रीनवर असणे, डूमस्क्रोलिंग, ऑफिसच्या डेडलाईन्स, प्रोजेक्ट्सचा भार किंवा जागं राहून फक्त विचार करणं असो; झोप ही सर्वात आधी बाजूला ठेवली जाणारी गोष्ट आहे. २०२५च्या झोपेच्या आकडेवारीच्या आहवालानुसार, जगभरातील सुमारे एक तृतीयांश प्रौढांना दिलेल्या सल्ल्याच्या सात तासांपेक्षा कमी झोप मिळते. याचे दीर्घकालीन परिणाम आता लक्षात आले नाही तरी थकवा, एकाग्रता कमी होणे आणि मूड स्विंग्स यामुळे संपूर्ण दिवस खराब होतो. त्यामुळे तात्काळ परिणाम टाळता येत नाहीत.


रात्री तुम्ही फक्त दोन तास झोपत असाल तर याचे किती विपरीत परिणाम तुमच्या मेंदूवर आणि शरीरावर काय होत असतील हे जाणून घेण्यासाठी दि इंडियन एक्सप्रेसने पीएसआरआय हॉस्पिटलच्या पल्मोनोलॉजी, क्रिटिकल केअर आणि स्लीप मेडिसिनच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. नीतू जैन यांच्याशी संवाद साधला. दीर्घकाळ झोपेचा अभाव उच्च रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, नैराश्य आणि स्मरणशक्ती कमी होण्याचा धोका वाढवतो.


मेंदू आणि शरीरावरील परिणाम


रात्री फक्त दोन तास झोपल्याने मेंदूचे कार्य करण्याची क्षमता गंभीररित्या बिघडते. यावर डॉ. जैन स्पष्ट करतात की, त्याचे सर्वात तात्काळ परिणाम म्हणजे थकवा, एकाग्रता कमी होणे, प्रतिक्रिया वेळ कमी असणे आणि चिडचिड होणे. त्यांच्या मते मेंदू माहिती कार्यक्षमतेने प्रक्रिया करण्यास संघरष करतो. त्यामुळे स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित करणे कमी होते. शरीरात हार्मोनल असंतुलन होते. कोर्टिसॉलची पातळी वाढते, ताण वाढतो, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. डॉ. जैन यांनी इशारा दिला की, रात्रीची झोप कमी झाल्याने सौम्य अल्कोहोलच्या नशेप्रमाणे समन्वय आणि निर्णय क्षमता बिघडू शकते.


डॉ. जैन यांनी सांगितले की, झोपेच्या तीव्र कमतरतेमुळे प्रीफ्रंटल कॉर्टेक्समधील हालचाल कमी होते. तो तर्कशास्त्र, निर्णय आणि आवेग नियंत्रणासाठी जबाबदार भाग आहे. तसंच राग आणि भीतीसारख्या भावनांवर नियंत्रण ठेवणाऱ्या अमिगडालाला जास्त उत्तेजित करतो. लोक भावनिकदृष्ट्या अधिक प्रतिक्रियाशील, चिंताग्रस्त आणि मूड स्विंग होण्याची शक्यता असते. निर्णय घेण्याची क्षमता आवेगपूर्ण होते आणि त्यांना संघर्ष किंवा ताण शांतपणे व्यवस्थापित करणं कठीण जातं.


त्वचा आणि वजनावर परिणाम

झोपेच्या कमतरतेची दृश्यमान लक्षणे काही दिवसांतच दिसू शकतात. डॉ. जैन यांनी सांगितले की, कोलेजनचे उत्पादन कमी झाल्यामुळे त्वचा निस्तेज होते आणि डोळ्यांखालील रक्तवाहिन्या अधिक ठळक होतात. त्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे निर्माण होतात. हार्मोनल असंतुलनामुळे वजनात चढ-उतार होऊ शकतो. कारण झोपेचा अभाव भूकेचे हार्मोन्स वाढवतो आणि तृप्तीचे हार्मोन्स कमी करतो. त्यामुळे जास्त पदार्थ खाल्ले जातात.


हृदय, मेंदू आणि मानसिक आरोग्यासाठी दीर्घकालीन धोके

डॉ. जैन याबाबत सावध करतात की, दीर्घकाळ झोपेचा अभाव उच्च रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, नैराश्य आणि स्मरणशक्ती कमी होण्याचा धोका वाढवतो. त्या स्पष्ट करतात की, विषारी पदार्थ काढून टाकण्याची मेंदूची श्रमता कमी होते, त्यामुळे संज्ञानात्मक घट होऊ शकते आणि अल्झायमरसारख्या न्यूरोडीजनरेटिव्ह विकारांचा धोका वाढू शकतो. झोपेचा दीर्घकालीन अभाव भावनिक लवचिकता देखील कमकुवत करतो आणि चिंता, बर्नआउटचा धोका वाढवतो.


कमी वेळ झोपण्याशिवाय पर्याय नसेल तर त्यावर मार्ग काय?

२० ते ३० मिनिटांच्या कमी झोपा, हायड्रेशन, संतुलित आहार आणि नैसर्गिक प्रकाशाचा संपर्क या गोष्टी तात्पुरते सतर्क राहण्यास मदत करतात. मात्र, हे मार्ग केवळ तात्पुरते धोके टाळण्याचे उपाय आहेत, ते योग्य झोपेची जागा घेऊ शकत नाहीत.

फक्त दोन तास झोप होत असेल तर काय करावे?

अशावेळी डॉ. जैन यांनी सल्ला दिला की, ज्यांची रोज केवळ दोनच तास झोप होते, त्यांनी दररोज हळूहळू कालावधी ३० ते ६० मिनिटांनी वाढवावा, झोपण्याच्या वेळेत सातत्य ठेवावे आणि झोपण्यापूर्वी कॅफिन किंवा स्क्रीनचा वापर टाळावा. याबाबत झोपेच्या बाबतीतील तज्ज्ञांचा सल्ला योग्य ठरू शकतो.



निरोगी वृद्धत्वासाठी दररोज करा हा सोपा व्यायाम, या व्यायामामुळे शरीराची ताकद राहील टिकून

वय वाढत असताना, शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. स्नायू आणि हाडे कमकुवत होतात, ज्यामुळे दैनंदिन कामे करणे देखील कठीण होते. अशा परिस्थितीत, एक साधा व्यायाम वृद्धत्वाच्या आव्हानांना तोंड देण्यास मदत करू शकतो. चला त्याबद्दल अधिक जाणून घेऊया.
वयानुसार ताकद आणि हालचाल राखणे हे एक मोठे आव्हान बनते. सांधेदुखी, स्नायू कमकुवत होणे आणि संतुलनाच्या समस्या सामान्य होतात. परंतु या आव्हानांवर मात करण्यासाठी एक साधा व्यायाम खूप उपयुक्त ठरू शकतो.

हो, एक साधा व्यायाम तुमच्या वयानुसारही तुमचे शरीर मजबूत ठेवण्यासाठी खूप मदत करू शकतो. आपण स्क्वॅट्सबद्दल बोलत आहोत. चला जाणून घेऊया की स्क्वॅट्स तुमच्या वयानुसार तुमचे शरीर तंदुरुस्त आणि निरोगी कसे ठेवू शकतात.

दररोज स्क्वॅट्स करण्याचे फायदे

पायांची ताकद राखा - वयानुसार पायांचे स्नायू सर्वात आधी कमकुवत होतात. स्क्वॅट्समुळे मांड्या, कंबर आणि पायांच्या स्नायूंना बळकटी मिळते. मजबूत पायांमुळे तुम्हाला लांब अंतर चालण्याची, पायऱ्या चढण्याची आणि दैनंदिन कामे सहजतेने करण्याची ताकद मिळते.

हाडांची घनता वाढवा - स्क्वॅट्स हा वजन उचलण्याचा व्यायाम आहे. हाडांवर दबाव टाकून हाडांची घनता राखण्यास मदत होते. यामुळे ऑस्टियोपोरोसिससारख्या आजारांचा धोका कमी होतो.

संतुलन आणि स्थिरता सुधारते - वृद्धापकाळात पडणे ही एक मोठी चिंता असते. स्क्वॅट्समुळे कोअर स्नायू मजबूत होतात आणि संतुलन सुधारते, ज्यामुळे पडण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो.




Covid-19 Smell Loss: अनेक लोकांमध्ये वास ओळखू न शकण्याची समस्या का होऊ शकते कायमची? संशोधनातून कोरोनाचा गंभीर परिणाम उघड
सांधेदुखी कमी करते - योग्य तंत्राने नियमितपणे स्क्वॅट्स केल्याने गुडघे आणि कंबरेचे सांधे मजबूत होतात. यामुळे सांध्यांची लवचिकता सुधारते आणि कडकपणा आणि वेदना कमी होण्यास मदत होते.

दैनंदिन जीवन सोपे करा - मजबूत पाय आणि गाभा तुमची दैनंदिन कामे जसे की बसणे, वाकणे, उचलणे इत्यादी सोपे करतात.

पचनसंस्था निरोगी ठेवते - स्क्वॅट पोझिशनमुळे पोटाच्या स्नायूंवर नैसर्गिकरित्या दबाव येतो, ज्यामुळे आतड्यांची हालचाल सुधारते आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

सुरुवात कशी करावी आणि खबरदारी

जर तुम्हाला आधीच काही वैद्यकीय समस्या असेल किंवा सांध्याची गंभीर समस्या असेल, तर स्क्वॅट्स सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा फिजिओथेरपिस्टचा सल्ला घ्या.

सुरुवात कशी करावी - प्रथम वजन न करता बॉडीवेट स्क्वॅट्सने सुरुवात करा.

योग्य तंत्र: तुमची पाठ सरळ ठेवून आणि तुमचे पाय खांद्याच्या रुंदीइतके वेगळे ठेवून उभे रहा. तुमचे हात पुढे करा. आता हळू हळू खुर्चीवर बसल्यासारखे बसा. तुमचे गुडघे तुमच्या पायाच्या बोटांच्या पलीकडे जाणार नाहीत याची खात्री करा. शक्य तितक्या आरामात बसा आणि नंतर सुरुवातीच्या स्थितीत परत या.

खुर्चीवर बसणे - जर तुम्हाला संतुलन राखण्यास त्रास होत असेल तर खुर्चीसमोर उभे राहून बसणे सराव करा. यामुळे पडण्याचा धोका टाळता येईल.

हळूहळू सेट वाढवा - सुरुवातीला फक्त 5-8 वेळा स्क्वॅट्स करा आणि नंतर हळूहळू त्यांची संख्या वाढवा.
माहितीस्तव... रवि जवंजाळ.. सांगोला.

Thursday, 23 October 2025

स्वयंपाकघरातील ही एक वस्तू बदलेल घरातील वातावरण; वास्तुदोष होईल दूर, आर्थिक अडचणीही होतील दूर

प्रत्येकाला घरात सकारात्मक ऊर्जा हवी असते, यासाठी स्वयंपाकघरातील एक वस्तू महत्त्वाची ठरते. ही वस्तू वास्तुदोष दूर करून रखडलेली कामे पूर्ण करण्यास आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत करते. तसेच घरात संपत्ती आणि समृद्धी टिकवून ठेवते. ती कोणती वस्तू आहे आणि तिचा वापर कसा करायचा जाणून घेऊयात.

प्रत्येकाला आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा हवी असते, सकारात्मक वातावरण हवे असते. त्यासाठी काही उपाय करणेही गरजेचे असतात. कारण त्यामुळे जर वास्तूदोष असेल तर रखडलेली कामे पूर्ण होण्यास मदत होते. तसेच आर्थिक परिस्थितीही सुधारते. यातीलच एक उपाय म्हणजे स्वयंपाकघरातील एक वस्तू. प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात असणारी ही एक गोष्ट घरातील वातावरण नक्कीच बदलू शकते. तसेच आर्थिक अडचणी दूर करण्यासाठीही हा उपाय फलदायी ठरू शकतो. ती वस्तू म्हणदे धणे.

वास्तुनुसार धणे का खास असतात?


धणे पूजेमध्ये देखील वापरले जातात. ते देवी लक्ष्मीशी संबंधित आहे, त्याचा योग्य वापर केला तर घरात संपत्ती आणि समृद्धी टिकून राहते. तसेच वास्तुशास्त्रात धणे हे शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. ते सकारात्मक उर्जेशी संबंधित आहे. असे मानले जाते की धणे घरातील नकारात्मकता शोषून घेते आणि शांत आणि संतुलित वातावरण राखते. वास्तु तज्ज्ञांच्या मते, जर घरात वारंवार ताणतणाव, आजारपण किंवा आर्थिक समस्या येत असतील तर धण्याचा हा उपाय अवलंबणे फायदेशीर ठरू शकते.

घरी धणे कुठे ठेवावे?

तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एका लहान वाटीत धणे ठेवू शकता किंवा लाल कापडात बांधून दारावर लटकवू शकता. यामुळे घरात प्रवेश करणारी कोणतीही नकारात्मक ऊर्जा रोखण्यास मदत होईल.

स्वयंपाकघरातही धणे ठेवू शकता. ही दिशा अग्नि तत्वाचे प्रतिनिधित्व करते. म्हणून, ती तुमच्या घरातील उर्जेचे संतुलन राखण्यास मदत करते. तुम्ही ते तुमच्या घरात नक्कीच ठेवावे.

जर तुमच्या घरात आर्थिक समस्या येत असतील, तर शुक्रवारी तांब्याच्या भांड्यात धणे ठेवा. हे पाणी घरभर शिंपडा.त्यानंतर हे धणे वाळवा, त्यांना लाल किंवा पिवळ्या कापडात गुंडाळा आणि तुमच्या तिजोरीत ठेवा. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या घरात कायम राहील.

धणे साठवताना काय लक्षात ठेवावे

धणे नेहमी कोरडे आणि स्वच्छ असावे. जुने किंवा कुजलेले धणे कधीही पूजेमध्ये वापरू नये. दर शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी धणे बदला. धणे ठेवताना मनात चांगले विचार आणा.

घरात कोळ्याचे जाळे असणे शुभ आहे की अशुभ? जाणून घ्या

वास्तुशास्त्रानुसार, घरातील कोळीष्टके नकारात्मक ऊर्जा वाढवतात, ज्यामुळे कुटुंबात आर्थिक समस्या, मानसिक ताण आणि आरोग्याच्या तक्रारी वाढतात. बेडरूम, देवघर व स्वयंपाकघरातील जाळ्यांमुळे विशेषतः गंभीर वास्तुदोष निर्माण होतात, जे वैवाहिक संबंध आणि मुलांच्या आरोग्यावर परिणाम करतात.

घराची सकारात्मकता आणि समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी स्वच्छतेला अत्यंत महत्त्व दिले जाते. मात्र, अनेकदा आपण घराच्या छतावर, कोपऱ्यात कोळ्यांच्या जाळ्यांकडे दुर्लक्ष करतो. वास्तू तज्ज्ञांच्या मते हे दुर्लक्ष घरात मोठे वास्तुदोष निर्माण करू शकते.



घरात कोळ्याचे जाळे जास्त प्रमाणात असल्यास कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात अनेक समस्या येतात, असे मानले जाते. या समस्यांमध्ये सततची आर्थिक चणचण, कामांमध्ये अडथळे, तसेच कुटुंबातील सदस्यांमध्ये आळस, चिडचिडेपणा आणि एकूणच नकारात्मकता वाढणे यांचा समावेश असतो.



जर तुमच्या बेडरूममध्ये कोळ्याचे जाळे असल्यास मानसिक तणाव वाढतो. याचा थेट परिणाम पती-पत्नीच्या संबंधांवर होऊन त्यांच्यात सतत मतभेद आणि वैवाहिक समस्या निर्माण होऊ शकतात.



वास्तुशास्त्रानुसार, घराच्या कोपऱ्यात दीर्घकाळ जाळे राहिल्यास कुटुंबातील सदस्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो आणि हळूहळू आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.




घरात असलेल्या मंदिरात किंवा देवघरात कोळ्याचे जाळे अजिबात तयार होऊ देऊ नका. देवघरातील जाळ्यामुळे कुटुंबावर दुर्दैव येते आणि ते अशुभ मानले जाते.


स्वयंपाकघरातील कोळ्याचे जाळे देखील अशुभ असते. यामुळे कुटुंबातील सदस्यांना सतत आरोग्याच्या समस्या किंवा आजार होण्याची शक्यता असते.



घरातील कोळ्याचे जाळे हे नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते, ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. यामुळे कौटुंबिक जीवनात तणाव निर्माण होतो. त्यामुळे मुलांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.


घरात अशांततेचे वातावरण तयार झाल्यामुळे आनंद आणि समृद्धीचा अभाव जाणवतो. म्हणून, जेव्हाही तुम्हाला घराच्या कोणत्याही कोपऱ्यात कोळ्याचे जाळे दिसेल, तेव्हा ते लगेच काढून टाकावे.



Sunday, 19 October 2025

त्यावेळी दिवाळीला कडाक्याची थंडी पडायची, पहाटे उठून हांड्याखाली जाळ घालायचा, पणत्या पेटवायच्या; समाधान देणारा सण

अंधाराला मागे टाकून प्रकाशाकडे वाटचाल करणारा आपला आवडता सण म्हणजे दिवाळी, दीपावली लक्ष लक्ष दीपांनी अवघे वातावरण प्रकाशमान करणारी आपली दिवाळी.


अंधाराला मागे टाकून प्रकाशाकडे वाटचाल करणारा आपला आवडता सण म्हणजे दिवाळी, दीपावली लक्ष लक्ष दीपांनी अवघे वातावरण प्रकाशमान करणारी आपली दिवाळी. दीपावली ही सर्वांसाठी एक आनंद पर्वणीच.

दिवाळी जवळ आली की, आकाश कंदील बनवायची कोण घाई! रानातून मोठा कोंडा (बांबू) कापून आणायचा. तो मधोमध फोडून त्याच्या हव्या तेवढ्या, हव्या तितक्या लांबीच्या कापट्या काढायच्या.

जाड सुताच्या दोऱ्याने त्या बांधून एकदाचा आकाशकंदिलाचा सांगाडा तयार करायचा. हे करायला दोन-चार दिवस लागत. मग बाजारातून हव्या त्या रंगाच्या फोली आणायच्या, कापायच्या खळ तयार करून त्याने त्या सांगाड्याला चिकटवायच्या खाली भरपूर शेपट्या लावायच्या.


मधोमध पणती किवा मेणबत्तीसाठी पोकळ बांबूची रुंद कापटी बांधून जागा ठेवायची.एकदा का आकाश कंदील तयार झाला की, गड जिंकल्याचा आनंद होई.

आता आकाशकंदील एक तर तयार मिळतात, किंवा सांगाडेही मिळतात, वर चिकटवायचे रंगीत कागद व्यवस्थित कापून मिळतात. गमने चिकटविले की झाला आकाशकंदील तयार, पण त्यावेळची ती आकाशकंदील बनवण्याची मजा काही औरच असायची.

आमच्या शेजारचा अशोक मात्र अजूनही कल्पक रित्या बिनपैशाचे पण भरपूर श्रमाचे आकाशकंदील बनवतो. कधी माडाच्या चुडत्तापासून तर कधी पोयांपासून माडीच्या पोवळ्यांचाही त्याने आकाशकंदील बनवला आहे. असो, हा आकाशकंदील दिवाळीच्या आदल्या रात्री अंगणात उंच चढविला जातो.

घरात आई दिवाळीच्या आदल्या दिवशी हांडा (मडकी) स्वच्छ घासून पाणी भरून न्हाणीच्या चुलीवर ठेवायची. मडक्याच्या गळ्याभोवती गंधाचे टिळे व त्यावर कुंक‌वाची बोटे लावून मडक्याच्या गळ्यात झेंडूची फुले व कारीटे यांची तयार केलेली माळ बांधायची. चुलीभोवती शेणाने सारवून त्यावर रांगोळी रेखायची.

पणत्यांची तेल-वात रात्रीच तयार करून ठेवली जाई. त्यावेळी दिवाळीला कडाक्याची थंडी पडायची. दिवाळीच्या दिवशी पहाटे लवकर उठून हांड्याखाली-जाळ घालायचा पणत्या पेटवायच्या.

देवा - तुळशी समोर, मागील दारी, न्हाणीघरात पणत्या पेटवून उरलेल्या पणत्यांची अंगणात छान आरास करायची. फटाके लावायचे. तद्‍नंतर देवासमोर बसवून आई आम्हाला आरती ओवाळायची.

तेल उटणे लावून कडकडीत पाण्याने आंघोळ घालायची. अभ्यंग स्नान झाल्यावर नवीन कपडे परिधान कररून तुळशी-समोर पायाने कारीट फोडायचे. (नरकासूर वधाचे प्रतीक, मग माग आम्हाला ताज्या दूधाचा गरमागरम चहा आणि फराळ खायला मिळायचा. एकूण

दिवस खूप आनंदाचा असायचा. या दिवसाचे वेगळेपण म्हणजे गावात जितकी घरे तितके पायी चालत जायचे. आधी कोणाकडे, नंतर कोणाकडे हे ठरायचे. त्या सर्वांच्या घरी सर्वांनी पोहे खायला चालत जायचे. पोहे खाणे, पत्ते खेळणे यात संपूर्ण दिवस आनंदान, गजाली करण्यात पत्ते खेळण्यात जाई, अन् दिवाळी मंगलमय होई.

अजून काही ठिकाणी ही परंपरा चालू आहे. पण याला आधुनिकतेचा स्पर्श झाला आहे. पण त्यावेळचा आनंद आता अनुभवायला मिळतो, की नाही सांगता नाही येत. आता ‘बूफे’पध्दती, किंवा आईस्क्रीम वगैरे दिले जाते. एकंदरीत दिवाळीचा पहिला दिवस एकमेकांतील स्नेह वृद्धिंगत करण्यात जाई. आत्ताही तो तसा जातोच, लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने मिठाई, चिरमुऱ्याचे वाटप होते. पूर्वी साखरेच्या पाकातले पोहे प्रसाद म्हणून वाटीत असत.

आपल्याबरोबर ज्यांच्या जीवावर आपले ग्रामीण जीवन अवलंबून आहे, अशा गायी गुरांचा पाडवा या दिवशी सकाळी गायी- बैल वासरे सर्वांची पूजा करून त्यांना कुंकूम तिलक लावून गळ्यात झेंडूच्या फुलांच्या माळा घालून गोडाचे पोहे व पोळी खायला दिली जायची.

त्यांची दिवाळीही आनंदाची जावी म्ह‌णून देवाकडे प्रार्थना केली जाई. नंतर अंगणात शेणाने गोठ्याची प्रतिकृती तयार करून एक हा गोठा झेंडूच्या फुलांनी सजवायचा व कारीटांनी हीर टोचून गुरे तयार करून या गोठ्यात ठेवली जात.

एक कारीट मधोमध फोडून त्यात दूध तूप घालून ठेवले जाई. या गोठ्याचीही पूजा, नैवेध केला जाई. संध्याकाळी गुरे गोठ्यात यायच्या वेळी हा गोठा सगळा आहे तसा, एकत्र गोळा करून गोठ्याच्या दारात ठेवला जाई, त्याला ‘फतला गौर’ म्हणतात त्यावर दोन काकडे पेटवून ठेवले जात.

Also Read
Diwali in Goa: नरकासुर वध, पाच प्रकारचे 'पोहे'; गोव्याची दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचा पारंपरिक विजयोत्सव
अशा तऱ्हेने मुक्या प्राण्यांप्रती भक्ती आणि आदर्शवत भावना मनात निर्माण व्हावी. आपल्याबरोबर त्यांचाही दिवस आनंदात घालवता यावा, सर्वांची दिवाळी आनंदाची व्हावी ही एकच इच्छा असायची.

या निमित्याने नात्यांचा उत्सव आणि नात्यांची वीण घट्ट राहावी या हेतूने दिवाळीच्या दिवशी पत्नी-पतीला तर भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला ओवाळते. सगळे एकमेकांना उदंड आयुष्य आरोग्य व सुख समाधान मागतात, असा हा दिवाळीचा सण कमी अधिक फरकाने गोव्यात साजरा केला जातो.


पूर्वी कडाक्याच्या थंडी इतकेच ओतप्रोत निरपेक्ष प्रेम असायचे, आताच्या युगात पैसा श्रेष्ठ ठरत असल्याने त्याला थोडा व्यावहारिकतेचा बाज आला आहे एवढेच. थंडीही आत्ता कमीच पडते, वातावरणातील फरकाचा परिणामही असावा.

एकूण काय तर गणेशचतुर्थी, दिवाळी, होळी सारखे सण सर्व समाजातील माणसांना एकत्र आणतात. सहजीवन ज‌गायला मिळते. सोबत दुखरे कंगोरेही जपले जातात. सर्वांना दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा.

भारतातील असं एक गाव जिथे दिवाळी साजरी केली जात नाही, हैराण करणारं कारण आलं समोर

भारतात एक असे गाव आहे तिथे दिवाळीचा सण साजरा केला जात नाही. दिवाळीच्या दिवशी या गावात शांतता पहायला मिळते. हे गाव कोणते आहे आणि या गावात दिवाळी का साजरी केली जात नाही ते सविस्तर जाणून घेऊयात.


संपूर्ण देशात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. सर्वांच्या घरी गोडधोड पदार्थ बनवले जात आहेत, अनेकजण फटाक्यांची खरेदी करत आहेत. प्रत्येकाने आपले घर सजवले आहे. भारताच्या कानाकोपऱ्यात हा उत्साह पहायला मिळत आहे. मात्र भारतात एक असे गाव आहे तिथे दिवाळीचा सण साजरा केला जात नाही. दिवाळीच्या दिवशी या गावात शांतता पहायला मिळते. हे गाव कोणते आहे आणि या गावात दिवाळी का साजरी केली जात नाही ते सविस्तर जाणून घेऊयात.

हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील सिहोतू पंचायतीतील अटियाला दाई गावात दिवाळीचा सण साजरा केला जात नाही. या गावात अंगारिया जमातीचे लोक राहतात. हे लोक एका वृद्धाच्या वचनाचे पालन करून, दिवाळी साजरी करत नाहीत. समोर आलेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी अंगारिया जमीतीतील एका वृद्ध व्यक्तीला कुष्ठरोग झाला होता. वैद्यकीय उपचारांच्या अभावामुळे अनेक लोकांना या आजाराने ग्रासले होते.

या आजारावर मात करण्यासाठी या व्यक्तीने दिवाळीच्या दिवशी एक खड्डा खणला आणि त्यात समाधी घेतली. समाधी घेताना या वृद्धाने गावकऱ्यांकडून एक वचन घेतले होते, जर कोणी भविष्यात येथे दिवाळी साजरी केली तर हे वचन शापात रूपांतरित होईल आणि हा आजार संपूर्ण गावात पसरेल. त्यानंतर हा आजार या गावातून नाहीसा झाला. याच कारणामुळे गावकऱ्यांनी दिवाळी साजरी करणे बंद केले. हीच परंपरा आजतागायत सुरु आहे.

या गावात अंगारिया जमीतीचे सुमारे 50 कुटुंबे राहतात. हे लोक दिवाळी साजरी करत नाहीत. लग्नानंतर या गावात आलेल्या सुनाही दिवाळी साजरी करत नाहीत. त्यांनीही समाजाची ही जुनी परंपरा पुढे चालू ठेवली आहे. काही तरुण रस्त्यावर फटाके वाजवतात, परंतु घरी दिवाळी साजरी केली जात नाही. अजूनही लोक त्या वृ्द्धाच्या शापाला भितात आणि दिवाळीला घरात पूजा करत नाहीत.

अटियाला दाई गावातील लोकांची ही केवळ परंपरा आहे की अंधश्रद्धा? हा प्रश्न अनेकांना उद्भवत आहे. देश सध्या प्रगती करत आहे, मात्र गावाखेड्यातील लोक अजूनही या अशा परंपरा पाळत आहेत. त्यामुळे अनेकजण अशा परंपरा नष्ट होणे गरजेचे आहे असं म्हणत आहेत.

तुम्हीही सतत नखे खाता का? अत्ताच सोडा ही सवय अन्यथा हा आजार होण्याचा धोका

अनेकांना नखे खाण्याची सवय असते. कामात मग्न असताना, चिंतेत असताना किंवा विचार करत असताना नकळतपणे नखे खाल्ली जातात. पण त्यामुळे आरोग्याचे गंभीर नुकसान होऊ शकते. तसेच यामुळे आजारही होऊ शकतात. याबद्दल जाणून घेऊयात. तसेच ही सवय कशी सोडायची हे देखील जाणून घेऊयात.

अनेकदा आपण पाहिलं असेल की अनेकांना नखे खाण्याची फार सवय असते. म्हणजे विचार करत असताना, टिव्ही पाहत असताना, किंवा चिंतेत असताना काहीजण नकळत बोटांची नखे खातात म्हणजे चावू लागतात. ही सवय लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये असते. पण ही सवय आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते. दातांनाही नुकसान पोहोचवू शकते. तसेच आजार होण्याचाही धोका असतो.


लोक नखे का चावतात?

लोक नखे का चावतात? त्याची कारणे व्यक्तीपरत्वे वेगवेगळी असतात. एका सिद्धांतानुसार नखे चावल्याने लोकांना त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. तथापि, ही एक निरोगी सवय नाही आणि तुमच्या आरोग्यावर त्याचा हानिकारक परिणाम होऊ शकतो.


नखे चावणे आणि तुमचे आरोग्य

अमेरिकन डेंटल असोसिएशनच्या मते, नखे चावल्याने दात किडतात. जर तुमच्याकडे ब्रेसेस असतील तर नखे चावल्याने दातांची मुळे किडतात, ज्यामुळे दात किडण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो.

हा आजार होण्याचा धोका 

संशोधनानुसार, नखे चावणाऱ्यांना ब्रुक्सिझम नावाचा आजार होण्याचा धोका जास्त असतो. ब्रुक्सिझम, ज्याला सामान्य भाषेत दात घासणे म्हणतात, ही एक सवय आहे जी बहुतेक लोक नकळत करतात. या सवयीमुळे डोकेदुखी, चेहऱ्यावर वेदना, दातांची संवेदनशीलता वाढते आणि अगदी दात किडणे देखील होऊ शकते. एवढंच नाही तर दातांवरील इनॅमल खराब होऊ शकते.

नखे चावण्याचे इतर धोके

दातांना नुकसान होण्याव्यतिरिक्त, नखे चावल्याने बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका देखील वाढू शकतो. तुमच्या दातांमध्ये ई. कोलाई आणि साल्मोनेला सारखे धोकादायक रोग निर्माण करणारे बॅक्टेरिया असू शकतात. जेव्हा तुम्ही तुमचे नखे चावता तेव्हा हे बॅक्टेरिया तुमच्या बोटांमधून तुमच्या तोंडात आणि आतड्यांमध्ये जाऊ शकतात, ज्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात. जे लोक सवयीने नखे चावतात त्यांना पॅरोनीचियाचा धोका वाढतो. ज्यामुळे बोटांमध्ये संसर्ग, सूज आणि पू तयार होऊ शकतो.

नखे चावण्याची सवय कशी सोडवायची?

तुमचे नखे नेहमी लहान ठेवा. जेणे करून ते चावल्या जाणार नाही

तुमच्या नखांना नेलपॉलिश लावा. किंवा महिलांमध्ये अशी सवय असेल तर नेल पॉलिश लावणे फायदेशीर ठरू शकते

जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमचे नखे चावावेसे वाटतील तेव्हा स्वतःचे लक्ष विचलित करा. दुसऱ्या कामात मन गुंतवा

निसर्गाचा चमत्कार! ‘या’ प्राण्यांचे रक्त असते निळे

आपल्या पृथ्वीवर हजारो प्रकारचे प्राणी आणि पक्षी असतात. यातील काही प्राणी आणि पक्षी हे अनोखे आहेत. यातील काही प्राण्यांचे रक्त हे लाल नसून निळे असते. आज आपण अशाच प्राण्यांची माहिती जाणून घेणार आहोत.

बापू गायकवाड
Updated on: Oct 19, 2025 | 6:36 PM
SHARE


जगात असंख्य प्राणी आहेत, मात्र यातील असे काही प्राणी आहेत, ज्यांचे रक्त माणसांप्रमाणे लाल नसून निळे आहे. हे प्राणी कोणते आहेत आणि निळ्या रक्तामुळे त्यांना काय फायदा होतो ते जाणून घेऊयात.

1 / 5

लाल ऐवजी निळे रक्त असणाऱ्या प्राण्यांमध्ये ऑक्टोपस, स्क्विड, विंचू आणि गोगलगाय यांचा समावेश आहे. त्यामुळे हे प्राणी इतर प्राण्यापेक्षा वेगळे आहेत.

2 / 5


या प्राण्यांच्या रक्तात हिमोग्लोबिनऐवजी हिमोसायनिन हे प्रथिन असते. या प्रथिनात लोह नसते, तर त्याऐवजी तांबे असते. त्यामुळे या प्राण्याचे रक्त लाल रंगाऐवजी निळे दिसते.

3 / 5

समुद्री घोड्यांचेही रक्त लाल रंगाचे नसून निळ्या रंगाचे असते. कारण या घोड्यांच्या रक्तात हिमोग्लोबिनची कमतरता असते किंवा त्याचे प्रमाण अत्यल्प असते.

4 / 5

मानवी आणि इतर प्राण्यांच्या रक्तात ऑक्सिजन मिसळल्यास ते लाल रंगाचे दिसते. मात्र वरील प्राण्यांच्या रक्तात ऑक्सिजन मिसळला गेल्यास ते निळ्या रंगाचे दिसते.

5 / 5

Saturday, 18 October 2025

जर तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर हवी असेल तर दिवाळीत लक्ष्मीपूजनावेळी वेळी या 7 गोष्टी नक्की करा

जर तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर हवी असेल तर दिवाळीत लक्ष्मीपूजनावेळी वेळी या 7 गोष्टी नक्की करादिवाळीत सर्वात महत्त्वाची पूजा समजली जाते ती म्हणजे देवी लक्ष्मीची. त्यामुळे घरात आनंद, समृद्धी, ऐश्वर्य येते. देवी लक्ष्मी मातेची पूजा केल्याने नक्कीच ऐश्वर्य प्राप्त होते. पण पूजा अजून फलदायी होण्यासाठी तसेच. घरात लक्ष्मी स्थीर राहण्यासाठी काही गोष्टी करणे फार गरजेचे असते. कारण लक्ष्मी पूजा हे एक शक्तिशाली साधन आहे. चला जाणून घेऊयात देवीची पूजा करताना कोणत्या 7 गोष्टी आवर्जून कराव्यात.


1. श्रीसूक्त आणि कनकधारा स्तोत्राचे पठण

हे सुद्धा वाचा
सकाळी उठल्यावर ही 5 कामं कधीही करू नका; तुमचा संपूर्ण दिवस खराब जाईल
छगन भुजबळ यांचा मुख्यमंत्र्यांना पहिल्यांदाच थेट इशारा; म्हणाले, ओबीसी DNA कधी...
सण काळवंडला... बाप, मुलगा आणि भाविकांसह 9 ठार, तर आजोबा, मावशी गंभीर जखमी; राज्यात काळजाचा ठोका चुकवणारे दोन अपघात...
देवी लक्ष्मीची पूजा करताना किंवा त्यानंतर लगेचच, श्रीसूक्त आणि कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. हे दोन्ही देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहेत आणि त्यांचा भक्तीपूर्वक जप केल्याने घरात स्थिर संपत्ती येते.

2. कमळाच्या बिया आणि कवच अर्पण करणे

पूजा करताना, देवी लक्ष्मीला कमळाचे बीज आणि पिवळ्या कवड्या अर्पण करणे शुभ मानले जाते. हे धन आकर्षित करतात. पूजा केल्यानंतर, या कवड्या आणि बिया लाल कापडात गुंडाळा आणि त्या तुमच्या तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवा.

3. तिजोरी किंवा लॉकर

पूजेमध्ये तुमच्या तिजोरी किंवा लॉकरसारखे संपत्तीचे ठिकाण समाविष्ट करा. तुमच्या हिशेबाच्या वह्यांवर, बिलांवर किंवा दुकानाच्या कॅश रजिस्टरवर कुंकवाने स्वस्तिक काढा आणि पूजा करा. व्यवसाय आणि उत्पन्न वाढवण्यासाठी हा विधी महत्त्वाचा आहे.

4. दक्षिणावर्ती शंखाची पूजा

जर तुमच्या घरी दक्षिणावर्ती शंख असेल तर तो पूजेसाठी ठेवा आणि त्याची पूजा करा. तो देवी लक्ष्मीचा धाकटा भाऊ मानला जातो आणि तो संपत्ती आकर्षित करतो. पूजा केल्यानंतर, तो तिजोरीत किंवा घरातील मंदिरात ठेवू शकता.

5. हळकुंड आणि पिवळे तांदूळ ठेवणे

पूजेदरम्यान हळकुंड ठेवून त्याची पूजा करा. तसेच, पिवळे तांदूळ तयार करण्यासाठी काही तांदळामध्ये थोडीशी हळद टाका. पूजेनंतर, हळकुंड आणि पिवळे तांदूळ लाल कापडात बांधा आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी धनाच्या ठिकाणी ठेवा.

6. दिव्यांच्या संख्येकडे लक्ष द्या

लक्ष्मीची पूजा केल्यानंतर, मुख्य प्रवेशद्वारावर, तुळशीच्या झाडाजवळ, तिजोरीजवळ आणि घराच्या चारही कोपऱ्यात शुद्ध तुपाचे 11 किंवा 21 दिवे लावा. या विधीमुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते.

7. खीर किंवा बत्ताशांचा नैवेद्य

देवी लक्ष्मीला खीर, साखरेचा गोड पदार्थ किंवा तांदळापासून बनवलेले शुद्ध मिठाई अर्पण करा. अर्पण केल्यानंतर, हे नैवेद्य प्रथम कुटुंबातील सदस्यांमध्ये आणि नंतर लहान मुलांना वाटून द्या. असे म्हटले जाते की या नैवेद्याचे सेवन केल्याने आर्थिक अडचणी कमी होतात. खऱ्या मनाने आणि भक्तीने ही कृती केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते, घरात सुख, समृद्धी आणि आर्थिक स्थिरता येते.

🌈 बाप....

*🌹'बाप'🌹*
     आजवर बऱ्याच जणांनी आईचं महत्व सांगितलं आहे. आई म्हणजे 'आत्मा आणि ईश्वर' या दोहोंचं एक रूप आहे. आई आपल्याला जीवन देते. आईमुळं आपणाला जग पाहण्याची संधी मिळते. खरंच आई पृथ्वी एवढी महान आहे. म्हणूनच आईला पृथ्वीची उपमा दिली आहे. आतापर्यंत या जगात कित्येक तत्त्ववेत्ते झाले. पण आजवर बाप मात्र दुर्लक्षिला गेला आहे. आई पृथ्वीप्रमाणे महान असेल तर बाप आकाशाएवढा उंच आहे. आईचं हृदय सागरासारखं विशाल असेल तर बापाचं मन आकाशाएवढं प्रचंड मोठं आहे. आईमुळं आपल्याला जेवण मिळत असेल तर बापामुळं आपल्याला जीवन मिळतं. बापामुळं आपल्याला नाव मिळतं, गाव मिळतं, आयुष्याची ओळख मिळते. जोपर्यंत बाप आहे तोवर कसलाही त्रास अन् ताप नसतो. ज्याचा बाप जिवंत आहे त्याच्या घराकडं वाईट नजरेनं बघायची कुणाचीही हिंमत होत नाही. कारण बाप म्हणजे भक्कम भिंत असलेल्या तटबंदीचा बुलंद दरवाजा असतो. बाप म्हणजे आपल्या जीवनाचं सुरक्षित असं कवच असतं. बाप म्हणजे जगण्यासाठी आधार देणारा 'आधारवड' असतो, अखंड मायेचा निर्झर असतो. तो सर्वस्व अर्पण करून कुटुंबाचं पालन करीत असतो. तो आपल्या मुलांचा 'पालनकर्ता' असतो.
    बापाचं जगणं हे स्वतःसाठी कधीच नसतं. तो प्राण पणाला लावून घरातील प्रत्येकासाठी जगत असतो. तो अर्धपोटी राहून उन्हातान्हात राबून घाम गाळत असतो, आपल्या मुलां-बाळांच्या भविष्यासाठी सतत झटत असतो. तो स्वतःच्या इच्छा-आकांक्षाकडे दुर्लक्ष करून अट्टाहासाने कुटुंबाच्या गरजा पूर्ण करीत असतो. तो आपल्या मुलांच्या काळजीनं आतून झुरत असतो. बाप कुटुंबाच्या सौख्य, समाधानासाठी स्वतःच्या सुखाला मुरड घालत असतो. त्याच्यामुळं आपल्या घराला घरपण मिळत असतं. तो कितीही अडचणीत असला तरी कुटुंबाच्या परमसुखासाठी कायम आसुसलेला असतो. आकार अन् आधार देऊन मुलांचं आयुष्य घडवण्यासाठी तो नेहमी तत्पर असतो. कष्टाची जाण आणि प्रामाणिकपणा या गोष्टी सांगून अन् शिकवून कधीच कुणाला अवगत होत नसतात. तर सद्गुण हे बापाच्या संस्कारातूनच मुलाच्या अंगी उतरले जातात. बापानं मुलांच्या भवितव्यासाठी फार मोठा त्याग केलेला असतो.
     मोठ्या कष्टानं तो मुलीचं शिक्षण करतो. तिला स्वावलंबी बनवून स्वतःच्या पायावर भक्कम उभा करतो. तिचे उज्वल कर्तृत्व पाहून तो मनोमनी आनंदीत होतो. पण परक्याचं धन म्हणून मुलीला सासरी पाठवण्याची धडपड मात्र बापाला नेहमी अस्वस्थ करत असते. एकेदिवशी आपलं घर सोडून ती जाणार याची त्याला फार खंत लागून राहते. मुलीचं भावी आयुष्य सुखा-समाधानानं जावं यासाठी अनुरूप स्थळ पाहून, हवं ते देऊन लग्न लावून दिलं जातं. अक्षता पडल्यावर मुलगी सासरी जाताना झाडासारखं खंबीर मन असणारा बाप पुरता खचून जात असतो. आपली पोरगी आपल्यापासून दूर जात आहे म्हणून बाप व्यथित होतो. अगतिक झालेल्या बापाच्या अश्रूंचा बांध फुटतो. मग तो तोंड लपवून त्या लग्नमंडपाच्या कोपऱ्यातल्या खांबाला धरून एकटाच हमसून-हमसून रडत असतो. रडतेवेळी डोळ्यातलं पाणी मात्र तो कुणाला दाखवत नसतो. बापाच्या हृदयात एक नाजूक असा हळवा कोपरा असतो. त्यानं हृदयाच्या हळव्या कोपऱ्यात मुलीच्या लहानपणच्या कोमल आठवणी जपून ठेवलेल्या असतात. त्या आठवणी तिच्या उज्वल भविष्याचा वेध घेत असतात. बाप आपल्या मुलीचा हात तिला आधार देण्यासाठी थोड्या काळासाठी धरत असतो. पण तो मुलीच्या हृदयाला मात्र आपल्या काळजाच्या घरात कायमचं जपून ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करत असतो. आजवर त्यानं तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला काळजाचा तुकडा नाईलाजास्तव तो परक्याच्या स्वाधीन करतो. त्याक्षणी मात्र त्याची अगतिकता आणि मनाची घालमेल पाहून साऱ्यांचं मन कसं हेलावून जातं.. हेलावून जातं..  
     आपल्या भारत देशात मुलांसाठी त्याग करणारे विशाल हृदयाचे चार कर्तृत्ववान बाप होऊन गेले. त्या चौघांनी या जगातील पुढील कित्येक पिढ्यांसाठी महान असा आदर्श निर्माण करून ठेवला आहे. 
१. सूर्यवंशी कुळातील राजा दशरथ :- दशरथ राजाचा ज्येष्ठ पुत्र प्रभू रामचंद्र यांनी सावत्र आईची आज्ञा प्रमाण मानून वनवास पत्करला. त्यावेळी पिता म्हणून राजाचा नाईलाज झाला. राजाचे श्रीरामावर अतिशय प्रेम होते. लाडक्या मुलावर वनवासाला जाण्याची वाईट वेळ आली, मुलगा आपल्यापासून दुरावला. याचे राजाला अतीव दुःख झाले. पुत्रवियोगाने दशरथ राजाने अन्न-पाणी वर्ज्य करून प्राणत्याग केला. चौदा वर्षांनंतर प्रभू रामचंद्रांनी भूतलावर सामान्य जनतेसाठी आदर्शवत असं रामराज्य निर्माण केलं.
२. यादव कुळातील राजपिता वसुदेव :- वसुदेव आणि देवकीच्या पोटी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. कर्दनकाळ असणारा कंसमामा बाळकृष्णाला जीवे मारणार याची पिता वसुदेवाला फार भीती होती. दुष्ट कंसाच्या तावडीतून बाळाची सुखरूप सुटका करणं भाग होतं. समोर यमुना नदी दुथडी भरून वाहत होती. मरण आ वासून उभं ठाकलं होतं. मृत्यूची तमा न बाळगता रात्रीच बाळाला टोपलीत घालून यमुना नदी ओलांडली. आपल्या बाळाला सुखरूपणे यशोदामातेकडे सुपूर्द केले. तोच बाळकृष्ण द्वारकेचा राजा झाला अन् जगाला गीतेतून महान उपदेश केला.
३. स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसले :- मोगलांकडून सामान्य जनतेचा अनन्वित छळ, अत्याचार चालू होता. हे शहाजीराजांना कदापि पाहवलं नाही. म्हणून त्यांनी रयतेचं हित जोपासण्यासाठी 'स्वराज्य' स्थापन करण्याचा महान संकल्प सोडला. त्या संकल्पपूर्तीसाठी त्यांनी आयुष्यभर कधी निजामाच्या तर कधी आदिलशहाच्या दरबारी सरदारकी गाजवली. इकडे स्वराज्यजननी जिजाऊसाहेबांनी शिवरायांना संस्काराचे धडे दिले. पित्याच्या कर्तृत्वाच्या आणि आशीर्वादाच्या पाठबळातून छत्रपती शिवरायांनी रयतेचं 'स्वराज्य' स्थापन केलं. त्यांनी रयतेचा आदर्श राजा म्हणून साऱ्या जगात नावलौकिक मिळविला.
४. स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजीराजे :- शिवपुत्र शंभूराजे हे स्वराज्याचे वारस आहेत. आपल्यामागे शंभूराजांनी यथोचितपणे स्वराज्याचं रक्षण करून ते वाढवलं पाहिजे. महाराजांनी आग्र्याच्या कैदेतून सुटका करून घेतल्यावर औरंगजेबाचे सैन्य त्यांना पकडण्यासाठी पाठलाग करत होतं. स्वराज्याचा वारस सुरक्षितपणे स्वराज्यात परत यावा यासाठी शिवरायांनी मन घट्ट करून शंभूबाळाचं जिवंतपणी पिंडदान केले. शिवपुत्र शंभूराजांनी पित्यानंतर प्राणाचं बलिदान देऊन रयतेच्या स्वराज्याचं रक्षण केलं.
    लेकरांसाठी कितीही कष्ट, यातना सोसायला अन् त्याग करायला तत्पर असतो, तो आपला बाप असतो. ज्या मुलांनी बापाचं कष्ट, तगमग डोळ्यांनी पाहिलेली असते. जी मुलं बापाच्या आज्ञेत अन् संस्कारात वाढलेली असतात. अशा मुलांना बापाच्या त्यागाची व कष्टाची पुरेपूर जाणीव असते. या जाणिवेतून मुलांचं उज्वल भवितव्य घडत असतं. आपल्या लेकरांचं कोडकौतुक पाहिल्यावर बापाचं काळीज आपसूकच मोठं होत असतं. आपली कर्तृत्ववान मुलं पाहून बापाला आभाळ ठेंगणं झाल्यासारखं वाटतं. मुलांचं सुख, समाधान ह्यातच बापाला सारं काही पावल्यासारखं वाटतं.
  "बापाकडं कधीच कुणी करू नका दुर्लक्ष..
   लेकरांवरती सदैव त्याचं घारीसारखं लक्ष.."
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
लेखक:- दिभा उर्फ दिगंबर 

Wednesday, 15 October 2025

संध्याकाळ होताच या गावात रडण्यास मनाई, महाराष्ट्रातलं हे अनोखं गाव कोणतं ?

महाराष्ट्रातील प्रत्येक गावाची काही ना काही खासियत आहे, त्यांचं असं काही वेगळेपण आहे, त्यामुळे ती प्रसिद्धही होतात. पण आपल्याच राज्यात एक असं गाव आहे जिथे संध्याकाळ झाल्यावर टिपं गाळायला म्हणजेच रडायला हो... परवानगी नाही. असं का बरं ? चला जाणून घेऊया.


संध्यारकाळनंतर अश्रू ठाळण्यास मनाई, जाणून घ्या अनोख्या गावाबद्दल..


संध्याकाळ झाली, सूर्य अस्ताला गेला, दिवेलागणीची वेळ झाली की घराघरात उदबत्तीचे सुवास दरवळतात, देवासमोर दिवा लावून शुभं करोती म्हटलं जातं. प्रत्येकाच्या घरची परंपरा वेगळी असेलही पण भाव मात एकच, विधात्यासमोर नतमस्तक होण्याचा. संध्याकाळच्या वेळेस अनेक गोष्टी करू नये असं म्हणतात, त्यापैकी एक म्हणजे संध्याकाळी, रात्रीच्या वेळेस रडू नये. बहुतांश लोकांना हे माहीत असेल आणि पाळलंही जातं. महाराष्ट्रात अनेक गाव, त्यांची वेगळी खासियत, वैशिष्ट्य, म्हणून ती प्रसिद्ध देखील आहेत.


पण याच महाराष्ट्रात असं एक गाव आहे जिथे संध्याकाळी रडण्यास मनाई आहे. जर रडायला आलं तरीही लोकं सकाळ होण्याची वाट बघतात आणि मगच अश्रूंना वाट मोकळी करून देतात. ऐकून आश्चर्य वाटलं ना ! पण हे खरं आहे, कोकणातील सिंधुदुर्गात एक असं गाव आहे, श्रावणगाव , तिथे संध्याकाळी रडण्याची परवानगी नाही.


काय आहे खास कारण ?


पण तसं पहायला गेलं तर संध्याकाळी रडण्यास मनाई ही काही अलिकडची गोष्ट नाही. ही परंपरा शतकानुशतके जुनी आहे. त्यामागे एक खास कथाही आहे. जर कोणी संध्याकाळी किंवा संध्याकाळनंतर रडलं तर ग्रामदेवता क्रोधित होते आणि गावकऱ्यांना शाप दिला जातो असं म्हटलं जातं. कोकणात वसलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्रावणगाव नावाच्या या गावाला एक अनोखी परंपरा आहे.

या गावच्या ग्रामदेवता हिंसाचाराचा तिरस्कार करते. म्हणूनच, इथले 100% लोक शाकाहारी आहेत. आणि याच कारणामुळे संध्याकाळी रडणे, भांडणे किंवा गोंधळ घालणे निषिद्ध आहे. जर चुकून एखाद्याच्या घराबाहेर रडण्याचा किंवा भांडण्याचा आवाज आला तर त्या घरातील सदस्यांना ज्येष्ठ लोकांच्या ग्रामपंचायतीसमोर हजर राहून स्पष्टीकरण द्यावं लागतं आणि पश्चात्ताप करावा लागतो. नाहीतर ग्रामदेवता कोपण्याची आणि शापाची भीती असते.

हे गाव कशासाठी प्रसिद्ध ?

साधारणपणे, कोकणातील गावं ही हापूस आंबे, काजू, नारळ आणि जांभळाची झाडे, कोकम सरबत आणि विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखली जातात, परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्रवणगावने वेगळ्याच कारणासाठी आपली ओळख निर्माण केली आहे. या गावचे गावकरी अजूनही या प्राचीन परंपरेचे आणि श्रद्धेचे पूर्ण भक्तीने पालन करतात. यामुळेच त्यांच्या गावात आपत्ती आणि संकटे टळतात असं त्यांचं म्हणणं आहे. कोणत्याही समस्या उद्भवल्यास त्या लवकर सोडवल्या जातात असाही विश्वास त्यांना आहे.

श्रावणबाळ आणि राजा दशरथाशी निगडीत तलावही इथेच

या गावाबद्दल अशी एक मान्यता आहे की, राजा दशरथाच्या धनुष्यातून निघालेल्या बाणाने श्रवणकुमारचा मृत्यू झाला होता. ज्या तलावातून श्रवणकुमार आपल्या तहानलेल्या आईवडिलांसाठी पाणी आणण्यासाठी गेला होता, तो तलाव याच गावात आहे असे मानले जाते. आजही या तलावाच्या पाण्याने भात शिजवला की तो रक्तासारखा लाल होतो, असंही म्हटलं जातं. या तलावाचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यात कितीही पाऊस पडला तरी हा तलाव भरून वाहत नाही आणि उन्हाळा आला की तलावातील पाणी बाहेर पडून रस्त्यांमध्ये आणि शेतात पसरतं.

Monday, 13 October 2025

सकाळचा पहिला घास शरीरासाठी वरदान की विष? जाणून घ्या ८ हेल्दी आणि ८ हानिकारक पदार्थांची यादी

सकाळी उठल्यावर काय खाता हेच तुमच्या आरोग्याचा पाया ठरू शकते. काही पदार्थ रिकाम्या पोटी फायदेशीर असतात तर काहींमुळे पचन बिघडू शकते. जाणून घ्या कोणते ८ पदार्थ खावेत आणि कोणते ८ नक्की टाळावेत.


रिकाम्या पोटी खाण्यास योग्य आणि टाळावयाचे पदार्थ 

आपण झोपेत असताना, आपले शरीर काही तास अन्नाशिवाय काम करते. सकाळी उठल्यानंतर, शरीराला चयापचय सुरू करण्यासाठी आणि दिवसभरासाठी ऊर्जा प्रदान करण्यासाठी योग्य इंधनाची आवश्यकता असते. पण, आपण उठताच काय खातो यावर आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. काही पदार्थ रिकाम्या पोटी घेतल्यास पचन बिघडू शकते, आम्लपित्त वाढू शकते किंवा थकवा जाणवू शकतो. उलट काही नैसर्गिक आणि संतुलित पदार्थ शरीराला ऊर्जा, एकाग्रता व ताजेतवानेपणा देतात.


बर्‍याच जणांना वाटते की, काहीही खाल्ले तरी चालते; पण तसे नाही. सकाळची पहिली आहार निवड आपले वजन, पचनक्रिया, त्वचा, मेंदूची कार्यक्षमता व मूडवर थेट परिणाम करीत असते. म्हणूनच आपल्या शरीराला कोणते घटक सर्वप्रथम मिळतात याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. चुकीच्या आहारामुळे दिवसभर थकवा येऊ शकतो, तर योग्य आहारामुळे कमी खाल्ले तरी ऊर्जा टिकून राहते. त्यामुळे सकाळचा नाश्ता हा केवळ पोट भरण्यासाठी नसून शरीराला पोषण देण्यासाठी असतो.


रिकाम्या पोटी खाण्यास योग्य पदार्थ
१. कोमट लिंबूपाणी
सकाळी लिंबू पाणी प्यायल्याने चयापचय क्रिया सुरू होते आणि पचन सुधारते. त्यामुळे शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते.


२. ओट्स
ओट्स फायबरने समृद्ध असल्याने, तुम्हाला ते जास्त काळ पोट भरलेले ठेवते आणि रक्तातील साखर नियंत्रित करते.


३. दही
प्रथिने आणि प्रो-बायोटिक्सने भरलेले दही पचनसंस्थेसाठी अत्यंत फायदेशीर आहे.

४. अंडी
अंडी हा नाश्त्यासाठी एक पौष्टिक आणि पोटभर पर्याय आहे. कारण- हा प्रथिने, जीवनसत्त्वे व खनिजांचा उत्तम स्रोत आहे.

५. ग्रीन टी
अँटीऑक्सिडंट्सने भरलेली ग्रीन टी चरबी जाळण्यास आणि मेंदूला सतर्क ठेवण्यास मदत करते.

६. ब्लूबेरी
वजन नियंत्रणासाठी ब्लूबेरी हा एक उत्तम पर्याय आहे. कारण- त्यात कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असते.


७. बदाम
हेल्दी फॅट्स, प्रोटीन व फायबरमुळे बदाम सकाळी ऊर्जा देतात आणि भूक आटोक्यात ठेवतात.

८. चिया बिया
ओमेगा-३ आणि फायबरने समृद्ध असलेल्या चिया बिया शरीराला दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा प्रदान करतात.

रिकाम्या पोटी टाळावेत असे पदार्थ
१. कॉफी
रिकाम्या पोटी कॉफी प्ययाल्याने पोटातील आम्ल अचानक वाढू शकते आणि पोटात आग पडतेत. जर हे दीर्घकाळ चालू राहिले, तर त्यामुळे पोटाच्या समस्या आणि छातीत जळजळ होऊ शकते.


२. तिखट पदार्थ
रिकाम्या पोटी मिरच्या आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटाच्या अस्तरांना त्रास होऊ शकतो, ज्यामुळे आम्लता, वेदना किंवा उलट्यांचा धोका वाढतो.

३. लिंबूवर्गीय फळे
संत्रे, मोसंबी, लिंबू यांसारख्या फळांमध्ये नैसर्गिक आम्ल खूप प्रमाणात असते. जर रिकाम्या पोटी त्यांचे सेवन केले, तर कमकुवत पचनसंस्था असलेल्यांना लगेच जळजळ होऊ शकते.

४. सोडा/गॅसयुक्त पेये
सोडा किंवा कार्बोनेटेड पेयांमधील कार्बन डाय-ऑक्साइडमुळे पोटात गॅस होतो. सकाळी हे सेवन केल्याने सतत पोट फुगणे आणि ढेकर येणे हा त्रास होऊ शकते.


५. साखरयुक्त पदार्थ
डोनट्स, केक किंवा साखरयुक्त पेये तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण खूप लवकर वाढवू शकतात. पण, नंतर ती अचानक कमी होते आणि तुम्हाला थकवा, चिडचिड किंवा डोकेदुखी जाणवू शकते.

६. तळलेले पदार्थ
समोसे, वडे, भजी यांसारख्या तळलेल्या पदार्थांमध्ये भरपूर तेल असते. रिकाम्या पोटी हे पदार्थ खाल्ल्याने पोटात जडपणा आणि आळस येऊ शकतो.


७. प्रोसेस्ड फूड
चिप्स, पॅकेट स्नॅक्स किंवा इन्स्टंट नूडल्समध्ये प्रिझर्व्हेटिव्ह्ज आणि कृत्रिम चव भरपूर असते. जर ते रिकाम्या पोटी खाल्ले, तर पोटाला त्याची सवय नसल्याने ते गॅस किंवा पोटदुखीचे कारण बनू शकतात.

८. काही दुग्धजन्य पदार्थ
दूध, चीज किंवा क्रीमसारख्या पदार्थांमुळे काही लोकांमध्ये गॅस किंवा सैल हालचाल होऊ शकते. दुधामधील लॅक्टोज नावाच्या नैसर्गिक साखरेचे पचन न होण्याचा त्रास असेल्यांनी त्यांनी सकाळी दुधाऐवजी हलके पर्याय निवडावेत.

Sunday, 12 October 2025

गोष्टी विसरता, कामं लक्षात राहत नाहीत… मग स्मरणशक्तीसाठी हे आयुर्वेदिक उपचार करून पहा

आपण कितीही टेक्नोसॅव्ही झालो तरी अनेकदा आपल्याला आयुर्वेदाचा आधार हा घ्यावाच लागतो. शिवाय आयुर्वेद हाच अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांवर एकमेव उपाय असल्याचे म्हटले जाते.

स्मरणशक्तीसाठी आयुर्वेदिक उपचार

Ayurvedic remedy for memory: सध्याच्या जीवनशैलीमध्ये आपल्या डोक्यात एकाच वेळी बरेच विचार सुरू असतात. घर, काम किंवा मित्र तसंच इतर गोष्टींबाबत सातत्याने विचार सुरूच असतात. २०२५मध्ये आपण कितीही टेक्नोसॅव्ही झालो तरी अनेकदा आपल्याला आयुर्वेदाचा आधार हा घ्यावाच लागतो. शिवाय आयुर्वेद हाच अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांवर एकमेव उपाय आहे. परदेशी वैद्यकीय प्रणाली प्रत्येक आजारावर उपचार करते, मात्र ५ हजार वर्षे जुन्या आयुर्वेदाला आव्हान देणे कठीण आहे. म्हणूनच इतका विकास होऊनही आयुर्वेद अजूनही विश्वासार्ह मानले जाते. आयुर्वेद प्रत्येक आजारावर उपचार करते आणि जेव्हा मेंदूंशी संबंधित समस्यांचा विचार केला जातो तेव्हा अधिक चांगली उपलब्धता देते.


आयुर्वेदात मेंदूच्या पोषणाबाबत जाणून घ्या…

आजच्या काळात मेंदू कमकुवत होणे, विसरणे आणि मानसिक थकवा यासारख्या समस्या सर्रास झाल्या आहेत. आयुर्वेदात सांगतात की, यावर दोन औषधांनी उपचार करता येतो. ही औषधं म्हणजे ब्राह्मी आणि शंखपुष्पी. ब्राह्मी आणि शंखपुष्पी हे मेंदूसाठी वरदान मानले जातात. दोन्हीही प्रत्येक समस्येवर उपायकारक आहेत. सर्वात आधी ब्राह्मीबद्दल जाणून घेऊ…


ब्राह्मी वनस्पतीला लहान पाने आणि लहान पांढरी फुले असतात. आपल्या देशातील पावसाळी राज्यांमध्ये या वनस्पतीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. आयुर्वेदात या वनस्पतीला बुद्धीची दाता मानले जाते.


शांतता मिळते

ब्राह्मीचं सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढते आणि एकाग्रताही वाढते. याव्यतिरिक्त ही वनस्पती चिंता आणि तणाव कमी करते. कारण याच्या सेवनाने डोक्यातील नसा शांत राहतात आणि मेंदू अधिक कार्यक्षम होतो. ब्राह्मीमध्ये बॅकोसाइज असते, जे डोक्यातील नसांना मजबूत बनवतात. तसंच तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करतात.

शंखपुष्पीदेखील मेंदूसाठी वरदान आहे. आयुर्वेदात याला मेधावर्धक असे म्हटले जाते. म्हणजेच ते डोक्याला ऊर्जा देण्याचं काम करतात, तसंच भावनिक संतुलन राखण्यासाठी मदतही करते. शंखपुष्पीचं सेवन केल्याने झोपही चांगली लागते. त्यामुळे तुमची मानसिक स्थिती उत्तम राहते आणि जास्त भावनिक करणाऱ्या डोक्याच्या भागावर नियंत्रण ठेवते.


दूधाचं सेवन करा

ब्राह्मीचं चूर्ण तुम्ही घेऊ शकता. हे चूर्ण तूप किंवा दूधासोबत घएऊ शकता. जर मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नसेल तर हे चूर्ण मुलांना एकाग्रता वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. ब्राह्मीच्या तेलाने डोक्याची मालिश करू शकता. शंखपुष्पी काढ्याचेदेखील सेवन करता येईल. बाजारात ते पावडरच्या स्वरुपातही ते उपलब्ध आहे. महत्त्वाचे म्हणजे दोन्हीचे एकत्र सेवन केल्याने परिणाम सुधारतील. तसंच या दोन्ही पावडर कोमट दूधात मिसळून त्याचे सेवन केले जाऊ शकते.

Saturday, 11 October 2025

वास्तुनुसार घरात या ठिकाणी मीठ चुकूनही ठेवू नये; अन्यथा नकारात्मकता झपाट्याने आकर्षित होते

मीठ हे केवळ चव आणणारे घटक नाही तर त्यामुळे घरातील वातावरण ते नकारात्मक ऊर्जा यासर्वांवरच रामबाण उपाय आहे. पण दर योग्य पद्धतीने मीठ साठवले नाही, योग्य दिशेला ठेवले नाही तर मीठ नकारात्मक परिस्थिती निर्माण करू शकते. त्यामुळे मीठ योग्य प्रकारे साठवणे फार महत्त्वाचे मानले जाते.


हिंदू संस्कृतीत, प्रत्येक वस्तूला विशेष महत्त्व दिले जाते, विशेषतः जेव्हा ती अन्नाशी संबंधित असते. अशीच एक गोष्ट म्हणजे मीठ. मीठ जे केवळ चवीसाठीच वापरलं जातं असं नाही तर वास्तूशास्त्रात आणि ज्योतिषशास्त्रात मिठाचे

जीवनात संतुलन राखण्याचे घटक देखील मानले जाते. अन्नाला चवदार बनवण्याव्यतिरिक्त, ते सकारात्मकता आणि संतुलनाचे प्रतीक देखील मानले जाते. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात मिठाचे फार महत्त्व सांगण्यात आले आहे. मिठाचा संबंध कायम सकारात्मक आणि नकारात्मत उर्जेशी लावला जातो. घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी, सकारात्मक ठेवण्यासाठी नेहमी कापूर आणि मिठाचे फार महत्त्व सांगितले जाते. पण त्यासाठी वास्तुनुसार मीठ योग्य ठिकाणी आणि दिशेने ठेवणे महत्वाचे आहे, जे सभोवतालच्या उर्जेचे संतुलन राखते. चला जाणून घेऊयात मिठाचे अनेक फायदे आणि ते योग्य पद्धतीने कसे ठेवावे ते

मीठ कसे साठवावे?

ज्योतिषशास्त्रात, मीठ चंद्र आणि शनिशी संबंधित असल्याचे मानले जाते. जर ते योग्यरित्या साठवले तर ते घरात शुभ उर्जेचा सतत प्रवाह राखते. वास्तु तज्ज्ञांच्यामते मीठ नेहमी काचेच्या, सिरेमिक किंवा स्टीलच्या तेही झाकण असलेल्या भांड्यात साठवावे. असे केल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि आर्थिक अडचणी कमी होतात. तथापि, लोखंडी किंवा अॅल्युमिनियमच्या भांड्यात मीठ साठवल्याने अशुभ परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे तणाव, संघर्ष आणि आर्थिक नुकसान होऊ शकते.

मीठ कोणत्या दिशेला ठेवावे?

धार्मिक मान्यतेनुसार, स्वयंपाकघरात मीठ कोणत्या दिशेने साठवले जाते हे देखील महत्त्वाचे मानले जाते. तज्ज्ञांच्या मते आग्नेय दिशेला मीठ साठवणे शुभ मानले जाते. या ठिकाणी मीठ ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य टिकते आणि आजारांपासून आराम मिळतो.

चुकूनही मीठ असे ठेवू नका

असे म्हटले जाते की मीठ उघड्या भांड्यात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. यामुळे कुटुंबात कलह, वाद आणि आर्थिक संकट येऊ शकते. म्हणून नेहमी स्वच्छ, झाकलेल्या भांड्यात मीठ साठवावे. शास्त्रात असेही म्हटले आहे की मीठ हे देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचे प्रतीक आहे आणि ते योग्यरित्या साठवल्याने घरात धन आणि समृद्धी वाढते.

काचेच्या वाटीत जाडे मीठ किंवा पिंक सॉल्ट ठेवणे़

तसेच घराच्या एका कोपऱ्यात किंवा दाराच्या जवळ तुम्ही जाडे म्हणजे समुद्री मिठाची वाटी किंवा पिंक सॉल्टची वाटी ठेऊ शकता. ज्यामुळे घरात येणारी नकारात्मकता त्या मिठाच्या रुपाने शोषली जाईल आणि घरात प्रवेश करणार नाही. दोन ते तीन दिवसांनी हे मिठ बाथरुममध्ये टाकून द्यावे. पण असे कुठेही बाहेर फेकू नये.

रात्री झोपचं लागत नाही? मग चांगल्या झोपेसाठी ही ‘५’ योगासने करतील तुमची मदत

आधुनिक जीवनशैली, तणाव आणि अनियमित सवयींमुळे झोपेची समस्या वाढली आहे. पण काही सोपी योगासने नियमित केल्यास झोपेची गुणवत्ता सुधारते आणि तणाव दूर होतो. जाणून घ्या अशी ५ योगासने जी मन आणि शरीर दोन्हीला शांत करतात.

गाढ झोप आणि तणावमुक्त मनासाठी मदत करणारी ५ सोपी योगासने 

धावपळीची जीवनशैली आणि अनियमित आहार यांमुळे तणाव ही सामान्य समस्या बनली आहे. मानसिक तणावामुळे शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे झोपेच्या गुणवत्तेवरही वाईट परिणाम होतो. बऱ्याचदा रात्री कामाच्या किंवा इतर ताणतणावामुळे आपल्याला नीट झोप येत नाही आणि शरीरात ऊर्जेचा अभाव असल्याने दिवसभर थकवा जाणवतो. आजच्या पिढीला रात्री उशिरापर्यंत जागे राहण्याची आणि सकाळी उशिरा उठण्याची सवय झाली आहे, ज्यामुळे आपल्या शरीराचे घड्याळ बिघडते आणि ही समस्या दीर्घकाळात गंभीर आजारांना कारणीभूत ठरते. नीट झोप न येणे ही बाब मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.


नोएडा येथील योसोम योगा स्टुडिओमधील योग शिक्षक रजनीश शर्मा म्हणतात की, मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी योग्य झोप मिळणे आवश्यक आहे. पण, आधुनिक जीवनात कामाचा जास्त ताण यामुळे लोक झोपण्यापूर्वी त्यांचे मन शांत करू शकत नाहीत. त्यामुळे निद्रानाश, ताण व थकवा येतो. अशा परिस्थितीत झोपण्यापूर्वी काही हलकी योगासने केल्याने शरीर आणि मन अशा दोघांना आराम मिळतो आणि त्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते.


१. बालासन
झोपेसाठी बालासन खूप फायदेशीर आहे. त्यासाठी गुडघे वाकवून जमिनीवर बसा. दोन्ही पायांची बोटे एकत्र आणा आणि टाचांवर बसा. तुमचे हात पुढे करा किंवा ते तुमच्या शरीराजवळ ठेवा. नंतर तुमचे डोके जमिनीवर ठेवा आणि दीर्घ श्वास घ्या. बालासन नसांना शांत करते, तणाव कमी करते. तसेच त्यामुळे पाठ व खांद्यांचा ताण दूर होतो आणि खोल श्वास घेण्यास मदत मिळते.


२.  विपरीत करणी मुद्रा
भिंतीला टेकून पाठीवर झोपा. तुमचे पाय भिंतीवर सरळ ठेवा आणि तुमचे हात बाजूला आरामशीर ठेवा. हे आसन नसा शांत करते, मनाला आराम देते, पायांचा थकवा आणि सूज कमी करते आणि पाठदुखीपासून आराम मिळवून देते.


३. सुप्त मत्सेंद्रयासन
प्रथम पाठीवर झोपा. नंतर तुमचे पाय वाकवा आणि ते तुमच्या छातीकडे आणा. तुमचे पाय एका बाजूला आणि तुमचे डोके दुसऱ्या बाजूला वळवा. तुमचे खांदे जमिनीवर सपाट ठेवा. त्यामुळे पचन सुधारते, पाठीचा ताण कमी होतो आणि शरीर व मन शांत होते.

४. सुप्त बद्ध कोनासन 
प्रथम पाठीवर झोपा. त्यानंतर पाय एकत्र करा आणि गुडघे वाकवा, हात बाजूला करा. या आसनामुळे ताण आणि थकवा कमी होतो, कंबर व छाती मोकळी होते, श्वासोच्छ्वास वाढतो आणि नर्व्हस सिस्टीम संतुलित राहते.

५. शवासन
प्रथम पाठीवर झोपा, हात व पाय आरामात पसरवा. त्यानंतर डोळे बंद करा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा. हे आसन मन आणि शरीराला पूर्णपणे शांत करते, हृदय गती व रक्तदाब नियंत्रित करते आणि झोपण्यापूर्वी खोल विश्रांती देते.

ही योगासने नियमित केल्यास नीट झोप येते, तणाव कमी होतो आणि शरीर व मन दोन्ही ताजेतवाने राहतात.

तुळस योग्य पद्धतीने घरात लावल्यानंतर केवळ वास्तुदोष नाहीसा होत नाही, तर घरात सुख-समृद्धीही येते.

तुळस योग्य पद्धतीने घरात लावल्यानंतर केवळ वास्तुदोष नाहीसा होत नाही, तर घरात सुख-समृद्धीही येते.


हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र अशी वनस्पती मानलं जातं. या रोपाचं धार्मिक महत्त्व तर जास्त आहेच, पण तुळस ही औषधीदेखील आहे. तुळस लावणं हे केवळ शुभ मानलं जातं असं नाही, तर तिची पूजाही केली जाते. तुळस योग्य पद्धतीने घरात लावल्यानंतर केवळ वास्तुदोष नाहीसा होत नाही, तर घरात सुख-समृद्धीही येते. तर तुम्हालाही जर घरात तुळस लावायची असेल त्याची योग्य पद्धती आहे. तुळशीच्या मंजुळा म्हणजेच रोपट्याच्या टोकाला येणाऱ्या बिया यापासूनही तुम्ही तुळस उगवू शकता.


अनेकदा तुळस लावण्याची पद्धत केवळ योग्य नसल्याने तुळस मरते, सुकून जाते किंवा बहरत नाही. अशावेळी योग्य पद्धत वापरल्याने अशी वेळ येत नाही.

तुळशीच्या मंजुळा


तुळशीच्या मंजुळा म्हणजे तुळशीचं फुल असतं. या फुलांमध्ये तुळशीच्या अगदी लहान लहान आकाराच्या बिया लपलेल्या असतात. त्या कोवळ्या असताना कधीही तोडू नये. ही फुलं व्यवस्थित सुकली आणि काढण्यायोग्य झाली की हातावर घेऊन ती हळूवारपणे चोळा आणि त्यानंतर त्याच्या बिया दिसतील. या बिया कुंडीच टाकल्याने तुळस उगवते.


धार्मिक कथांनुसार, तुळशीच्या मंजुळा तेव्हाच तोडाव्यात जेव्हा त्या भुऱ्या होतात. तसंच त्या रविवारी किंवा मंगळवारी तोडू नयेत. तसंच त्या तोडून केवळ अशाच टाकायच्या नाहीत. त्या लाल कपड्यात गुंडाळून ठेवाव्यात. सोबतच या गोष्टीकडे लक्ष द्या की त्या पायाखाली येऊ नये.

तुळशीच्या मंजुळांचा वापर कसा करावा?

जेव्हा एखाद्या तुळशीच्या रोपावर मंजुळा आल्या तर तुम्ही त्यातून नवीन रोप उगवू शकता. त्यासाठी सर्वात आधी मंजुळा पूर्णपणे सुकून द्याव्यात. मग त्या हाताने तोडा. हलक्या हातांनी तळहातावर थोड्या चोळा आणि त्यातून बिया निघतील. एका कुंडीत थोडी माती टाका. थोडं ऊन आणि पाणी देता येईल अशा ठिकाणी कुंडी ठेवून त्या बिया त्यात टाका. काही दिवसांतच तुळशीचं रोप येईल.

दररोज किती ग्लास पाणी प्यावं १० की १४ ग्लास? शरीरातील घाण बाहेर काढण्यासाठी नेमकं किती पाणी प्यावं?

शरीरातील सगळी घाण, विष बाहेर काढा… फक्त ‘ही’ एक सवय लावून घ्या, किडनीसुद्धा राहील निरोगी
Daily water intake for body health: आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी, ऊती आणि अवयव योग्य कार्य
दररोज किती ग्लास पाणी प्यावं १० की १४ ग्लास?

आपल्या शरीराला योग्यरित्या कार्य करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता असते. त्या म्हणजे हवा, पाणी आणि अन्न. निरोगी शरीरासाठी पाणी अत्यंत महत्त्वाचे आहे. दिवसाची सुरूवात पाण्याने केल्याने शरीर हायड्रेट राहते. त्यामुळे अवयवांचे कार्य योग्यरित्या होण्यास मदत होते. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. मूत्रपिंड आणि यकृताचे कार्य सुधारते. हाडे, स्नायू आणि त्वचेसाठीदेखील पाणी खूप फायदेशीर आहे. पुरेसे पाणी प्यायल्याने ऊर्जा वाढते, थकवा कमी होतो आणि मानसिक आरोग्यासही मदत होते.


दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने तुमचे शरीर टॉक्सिनफ्री म्हणजेच विषमुक्त होते, पचन सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पाणी हे आपल्या शरीरासाठी सर्वात आवश्यक पोषक तत्व मानलं जातं. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी, ऊती आणि अवयव योग्य कार्यासाठी पाण्यावर अवलंबून असतात. मूत्रपिंडाच्या योग्य कार्यासाठी आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी दररोज पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे. मूत्रपिंडाचे आरोग्य राखण्यासाठी आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी दररोज किती पाणी पिणं गरजेचं आहे हे जाणून घेऊ…


मूत्रपिंडांसाठी पाणी का महत्त्वाचे आहे?


आपल्या शरीरात मूत्रपिंड हे पार्श्वभूमीचे काम करतात. टाकाऊ पदार्थ मूत्रमार्गे काढून टाकणे, किडनी स्टोन तयार होण्यापासून रोखणे, निरोगी रक्तदाब आणि गाळण्याची प्रक्रिया राखणे, चयापचय आणि विषारी संतुलन राखणे आणि स्नायू आणि मज्जातंतूंच्या कार्यासाठी इलेक्ट्रोलाइट संतुलन राखणे समाविष्ट आहे.


नॅशनल किडनी फाउंडेशन आणि इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनने सांगितल्याप्रमाणे, मूत्रपिंडाचे आरोग्य राखण्यासाठी पुरूषांना दररोज सुमारे ३.७ लिटर किंवा सुमारे १५ ते १६ कप पाणी पिण्याची आवश्यकता असते. महिलांना सुमारे २.७ लिटर किंवा ११ ते १२ कप पाणी पिण्याची आवश्यकता असते. वय, लिंग, शारीरिक हालचाल, हवामान आणि आरोग्य स्थितीनुसार पाण्याची गरज बदलते. उच्च सोडियम किंवा उच्च प्रथिनयुक्त आहार घेणाऱ्या लोकांना अधिक पाणी पिण्याची आवश्यकता असू शकते.


शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी किती पाणी प्यावे?

मूत्रपिंड आणि शरीरासाठी हायड्रेशन आवश्यक आहे. साधारणपणे, एका निरोगी प्रौढ व्यक्तीने दररोज अंदाजे अडीच ते साडेतीन लिटर पाणी प्यावे म्हणजेच अंदाजे १० ते १४ ग्लास. शारीरिक हालचाली आणि आरोग्य स्थिती तसंच हवामानानुसार हे प्रमाण बदलू शकतं.

पाणी शरीरातील विषारी पदार्थ कसे काढून टाकते?

पुरेसे पाणी प्यायल्याने मूत्रपिंडाचे कार्य व्यवस्थित होण्यास मदत होते. पुरेसे पाणी प्यायल्याने रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि विषारी पदार्थ मूत्रमार्गे बाहेर पडतात. पुरेसे पाणी प्यायल्याने मूत्र पातळ होते आणि त्यामुळे क्रिस्टल किंवा किडनी स्टोन तयार होण्याची शक्यता कमी होते. पुरेसे पाणी प्यायल्याने चयापचय आणि इलेक्ट्रोलाइट पातळी राखली जाते. तसंच शरीरात विषारी पदार्थ जमा होण्यापासून रोखले जाते, त्वचा निरोगी राहते, यकृताचे कार्य सुधारते आणि पचनही सुधारते.

Friday, 10 October 2025

नमस्कार आणि नमस्तेमध्ये नेमका फरक काय? 99 टक्के लोकांना नाही सांगता येणार

आपल्या दैनंदिन जीवनात आपण दररोज अनेकदा नमस्कार आणि नमस्ते या दोन शब्दांचा वापर करत असतो, मात्र नमस्कार कधी म्हणायचं आणि नमस्ते कधी म्हणायचं हेच आपल्याला माहीत नसतं, आपण अनेकदा चूक करतो, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

आपल्या दैनंदिन जीवनात आपण दररोज अनेकदा नमस्कार आणि नमस्ते या दोन शब्दांचा वापर करत असतो, मात्र नमस्कार कधी म्हणायचं आणि नमस्ते कधी म्हणायचं हेच आपल्याला माहीत नसतं, आपण अनेकदा चूक करतो, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.


नमस्कार आणि नमस्ते हे दोन शब्द सारखेच वाटतात, त्याचा अर्थ देखील एकच होतो. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला भेटतो तेव्हा सर्वात आधी भारतीय संस्कृतीप्रमाणे त्याला नमस्कार किंवा नमस्ते असं म्हणतो, त्यानंतर त्यांची चौकशी करतो, मात्र हे दोन्ही शब्द जरी एकच वाटत असले तरी त्यामध्ये फरक आहे. मात्र आपल्याला हा फरक माहीत नसल्यानं आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला भेटतो, तेव्हा आपण नमस्ते किंवा नमस्कार यापैकी कोणत्याही एका शब्दाचा प्रयोग करतो, मात्र कोणाला नमस्कार म्हणायचं? कोणाला नमस्ते म्हणायचं? याचे देखील काही नियम आहेत.

जसं की दीन आणि दिन हे मराठी भाषेतील दोन शब्द आहेत, दीन याचा अर्थ गरीब असा होतो, तर दुसरा दिन जो आहे त्याचा अर्थ दिवस असा होतो, इथे फरक फक्त एका वेलांटीचा आहे, मात्र दोन्ही शब्दांचे अर्थच बदलून जातात, आणखी एक उदाहरण द्यायचं झालं तर रवी आणि रवि या दोन शब्दांचं देता येईल, यातील पहिला रवी जो आहे त्याचा अर्थ सूर्य असा होतो, मात्र दुसरा जो रवि शब्द आहे, त्याचा अर्थ दह्यामधून लोणी काढण्यासाठी जो रवि किंवा जे साधन वापरतात तो होतो. अशीच गंमत नमस्कार आणि नमस्ते या दोन शब्दांसंदर्भात आहे.


नमस्कार आणि नमस्तेमध्ये नेमका फरक काय? हा प्रश्न एका मुलाखतीदरम्यान देखील विचारला गेला होता. नमस्कार आणि नमस्ते हे देन्ही शब्द जरी एकच वाटत असले तरी त्यात खूप फरक आहे. जेव्हा आपल्यापेक्षा एखादा मोठा व्यक्ती आपल्याला भेटतो, तेव्हा आपण नमस्कार म्हटलं पाहिजे, आणि जेव्हा एखादा लहान व्यक्ती आपल्याला नमस्कार म्हणतो तेव्हा आपण त्याला नमस्ते म्हटलं पाहिजे. थोडक्यात काय तर आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीशी बोलताना नेहमी नमस्कार असं म्हणावं तर आपण जेव्हा आपल्यापेक्षा लहान व्यक्तीशी बोलत असतो तेव्हा नमस्ते या शब्दाचा उपयोग करावा हाच या दोन शब्दांमध्ये मुख्य फरक आहे.

Thursday, 9 October 2025

दही खाण्याची योग्य वेळ काय? 90 % लोकांना माहित नसेल, जाणून घ्या अन्यथा आजारी पडाल

 
दही खाण्याचे कितीसारे फायदे आहेत हे आपल्या सर्वांनाच माहित आहे.  पण ते खाण्याचे प्रमाण तसेच योग्य वेळ माहित असली की त्याचे फायदे दुप्पट मिळतात.  पण जवळपास 90 टक्के लोकांना दही खाण्याची योग्य वेळ माहित नसते.  


आहारात नेहमी दही असावं हे आपल्या सर्वांना माहित आहे. कारण दही खाण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात. पण दही खाण्याची योग्य वेळी आणि योग्य प्रमाण माहित असेल तर त्याचे नक्कीच दुप्पट फायदे आपल्याला मिळतात. आयुर्वेदात दही खाण्याच्या वेळेबद्दल आणि पद्धतीबद्दल काही नियम आहेत. त्यामुळे दही खाण्याची योग्य वेळ माहित असेल तर त्याचे फायदे होतात अन्यथा आरोग्यासाठी धाकादायक ठरते.


दररोज दही खाणे फायदेशीर आहे का? 

दही हे प्रोबायोटिक्सचा एक उत्तम स्रोत आहे. त्यातील चांगले बॅक्टेरिया आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. भाजलेल्या जिऱ्यासोबत दही मिसळून खाणे पचनसंस्थेसाठी आणखी फायदेशीर ठरेल. यामुळे बद्धकोष्ठता किंवा अपचन यासारख्या पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते. दही पोषक तत्वांनी समृद्ध असते आणि शरीरातील उर्जेची पातळी वाढवते. शिवाय, जर तुम्हाला थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल तर नियमितपणे दही खाणे फायदेशीर आहे.


दही कधी खाऊ नये?

आयुर्वेदानुसार रात्री दही खाऊ नये. रात्री दही खाल्ल्याने सर्दी, खोकला, सायनस आणि कफ वाढू शकतो. कारण दह्यात थंडावा देणारे गुणधर्म असतात. रात्री शरीराचे तापमान कमी होते, ज्यामुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. हिवाळ्यात, विशेषतः सकाळी किंवा रात्री दही खाणे टाळा. दह्यात जर भाजलेले जिरे पावडर घातली तर पचनासाठी नक्कीच फायदेशीर ठरते. याव्यतिरिक्त, दह्यात साखर किंवा मीठ घालल्याने त्याची चव तर वाढतेच पण त्याचे फायदेही दुप्पट होतात.

दही कोणी खाणे टाळावे?

दह्याचे अनेक फायदे असले तरी, काही आरोग्य समस्या असलेल्या लोकांनी ते खाणे टाळावे. हृदयरोग आणि उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्यांनी दही खाण्याबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे. दही फार थोड्या प्रमाणात खाल्लं पाहिजे तसंच कमी कॅलरीजवालं दही खाणे फायदेशीर ठरते. जर तुम्ही घरी बनवलेले दही खात असाल तर कमी कॅलरीयुक्त दूध निवडा.

गोड दही टाळावे का?

अनेकांना गोड दही आवडते. हे अनेक प्रकारे हानिकारक असू शकते. काहींना दह्यात साखर, किंवा ब्राऊन साखर किंवा गूळ घालून खाणे आवडते. पण साखर किंवा गुळ घालून दही खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. त्यामुळे कॅलरीजची संख्याही वाढते.

साखर घालून दही खाणे हे जास्त वजन असलेल्या किंवा मधुमेही व्यक्तींसाठी हानिकारक ठरू शकते. अनेकांना दह्यात काळे मीठ घालणे देखील आवडते. उच्च रक्तदाब किंवा मूत्रपिंडाचा आजार असलेल्यांनी दह्यात मीठ घालणे टाळावे. ज्यांना मूलभूत वैद्यकीय स्थिती नाही ते दह्याचा आनंद घेऊ शकतात. ज्यांना त्याचे पौष्टिक मूल्य वाढवायचे आहे त्यांच्यासाठी दही घालून सॅलेड खाणे हा एक उत्तम पर्याय आहे.

दही खाण्याचे आरोग्य फायदे

दही खाल्ल्याने हाडे आणि दात मजबूत होतात.

पोटाचे आरोग्य आणि पचनशक्ती मजबूत होते.

केसांना दही लावल्याने कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत होते.

त्वचेवर दही लावल्याने त्वचा निरोगी राहते.

टॅनिंगची समस्या देखील दूर होते

तसेच दही वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

महिनाभर साखर नाही खाल्ल्यामुळे शरीरात होती ‘हे’ बदल….

महिनाभर साखर नाही खाल्ल्यामुळे शरीरात होती ‘हे’ बदल…. साखर सोडणे जितके कठीण आहे तितके त्याचे परिणाम अधिक धक्कादायक आहेत. केवळ एक...